गुरसाळे कोरोना सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:40+5:302021-08-12T04:44:40+5:30
वडूज : कोरोनाचे संकट कमी होईपर्यंत गुरसाळे, ता. खटाव येथील सीसीसी व डीसीएचसी सेंटर सुरू ठेवण्याबाबत ग्रामपचांयतीने एकमुखी ठराव ...
वडूज : कोरोनाचे संकट कमी होईपर्यंत गुरसाळे, ता. खटाव येथील सीसीसी व डीसीएचसी सेंटर सुरू ठेवण्याबाबत ग्रामपचांयतीने एकमुखी ठराव केला. तसेच याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदनही देण्यात आले आहे.
निवदेन देताना पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रा. बंडा गोडसे, संरपच हसन शिकलगार, उपसरपंच ॲड. रोहन जाधव, सागर झेंडे, सचिन पाटोळे, बाजीराव जाधव, बाबासाहेब बागल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी सभापती मांडवे म्हणाले, ‘गुरसाळे येथील कोरोना हेल्थ सेंटर प्रशासनाने कोणत्या निकषावर बंद ठेवले आहे, हे गुरसाळे ग्रामस्थांना व आम्हालाही ज्ञात नाही. वास्तविक पाहता या सेंटरमुळे गुरसाळे परिसरातील शेकडो रुग्णांचे जीव वाचले आहेत. सेंटर बंद करण्याच्या निर्णयामुळे रुग्णांना त्रास व कोरोनायोद्धा यांच्यावर एकप्रकारे अन्याय होत आहे. त्यामुळे याची दखल घ्यावी, तर यावर पालकमंत्र्यांनी, संबंधित विषय गंभीर आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून योग्य तो मार्ग काढता येईल असे स्पष्ट केले.