इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधा रोपांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:41 AM2021-05-08T04:41:48+5:302021-05-08T04:41:48+5:30

सातारा : कोरोना महामारीमुळे लोक पुन्हा आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये डोकावू लागलेले आहेत. आयुर्वेदाचार्य यांच्या सल्ल्यानुसार लोक तुळस, अश्वगंधा अशा औषधी ...

Demand for Immune Booster Basil | इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधा रोपांना मागणी

इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधा रोपांना मागणी

googlenewsNext

सातारा : कोरोना महामारीमुळे लोक पुन्हा आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये डोकावू लागलेले आहेत. आयुर्वेदाचार्य यांच्या सल्ल्यानुसार लोक तुळस, अश्वगंधा अशा औषधी वनस्पतींच्या रोपांची मागणी करू लागले आहेत.

सातारा शहराच्या परिसरात मोठे घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक औषधी वनस्पती आढळतात. ज्यांना या वनस्पतींचा अभ्यास आहे, असे लोक त्याचा लाभ घेत आहेत; परंतु ज्यांना वनस्पतींची ओळखच नाही, त्यांना नर्सरीत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. नर्सरीचालक पूर्वी वेगळ्या रोपांची मागणी करत होते. मात्र, आता महामारी वाढल्याने इम्युनिटी वाढवणाऱ्या औषधी वनस्पतींची मागणी रोपवाटिकाचालकांकडे करू लागले आहेत. या औषधी वनस्पतींनी कोरोना महामारी काळात लोकांना घरगुती उपचार मिळवून दिले. सर्दी, कफ, ताप अशा आजारांमध्ये वेळीच आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबल्याने अनेक जण घरी राहूनच बरे झालेले आहेत.

कोट

नर्सरीमध्ये दरवर्षी आंबा, नारळ या मोठ्या झाडांना व फुलांच्या विविध जातींच्या रोपांना मागणी असते. गेल्या दोन वर्षांपासून तुळस, अश्वगंधा, पुदिना अशा औषधी वनस्पतींना मागणी वाढलेली असल्याने आम्ही नर्सरीमध्ये त्याची लागवड केलेली असून ग्राहकांना मागणीनुसार त्याचा पुरवठा करत आहोत.

- अलोक शिंदे, अजिंक्य नर्सरी

कोट..

शहर तसेच ग्रामीण भागात लोक आता कुंड्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत. नर्सरीतील तयार रोपे नेण्यावर लोकांचा जास्त भर आहे. त्यामुळे आम्ही अश्वगंधा, पुदिना, लिंबू, कडूलिंब अशा वनस्पतींची तयार रोपे देत आहोत.

- महेश पाटील, नर्सरीचालक

तुळस

हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पूजा केली जाते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक ऊर्जाच प्राप्त होत नाही, तर बऱ्याच आजारांपासून आपल्याला सुटकादेखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे.

पुदिना

उलटीचा त्रास होत असेल तर पुदिनाचे सेवन करणे फायद्याचे ठरते. छातीत कफ साठला असेल तर तो बाहेर काढायला मदत करते. शरीरात साठलेला अतिरिक्त घाम बाहेर काढण्याचे कामदेखील पुदिना करतो. ताप आलेला असताना अतिशय गुणकारी असे हे औषध आहे.

अश्वगंधा

आयुर्वेदात अश्वगंधा या वनस्पतीला अत्यंत महत्त्व आहे. शरीरातील ताण दूर करून शारीरिक स्फूर्ती आणि सौंदर्य प्राप्त करून देण्याचे काम अश्वगंधा ही वनस्पती करते. या औषधी वनस्पतीच्या योग्य सेवनाने ताणतणाव दूर होतात असा वैद्यांचा अभ्यास आहे.

कडूलिंबचे फायदे

मलेरियावरील उपचारासाठी कडूलिंबाचा वापर औषध म्हणून केला जाऊ शकतो. कडूलिंबाच्या पानांमध्ये गेडुनिन तत्त्व आढळते. मलेरियाच्या उपचारासाठी याचा फायदा होतो. डॉक्टरदेखील मलेरिया झाला असल्यास, कडूलिंब खाण्याचा सल्ला देतात.

लिंबू

लिंबू निरंतर फायद्यासह परिपूर्ण अष्टपैलू आहे. लिंबू हे व्हिटॅमिन सी चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो प्रामुख्याने रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. लिंबू शरीराची कार्ये टिकवून ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन करण्यास मदत करते. लिंबू हा पचनक्रिया मजबूत करणारा रस तयार करतो.

फोटो आहे टेम्प्लेट

Web Title: Demand for Immune Booster Basil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.