फोटो स्टुडिओंचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:29+5:302021-04-13T04:37:29+5:30
सातारा : अत्यावश्यक सेवेत करण्यात यावा व उपरोक्त कालावधीत फोटो स्टुडिओंना निर्बंधातून सूट देण्यात येऊन ते निदान दिवसातून काही ...
सातारा : अत्यावश्यक सेवेत करण्यात यावा व उपरोक्त कालावधीत फोटो स्टुडिओंना निर्बंधातून सूट देण्यात येऊन ते निदान दिवसातून काही काळ चालू ठेवणेस परवानगी देण्यात यावी यासाठीचे निवेदन आज फोटोग्राफिक वेल्फेअर असोसिएशन ऑफ सातारा यांच्या वतीने जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, ‘कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून आस्थापने बंद ठेवण्याबाबत सुधारित प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये विविध शासकीय कार्यालये, विमा, मेडिक्लेम कंपन्या, सहकारी पीएसयू,आणि खासगी बँका याशिवाय इतर वित्तीय सेवेशी निगडित असलेली सर्व शासकीय कंपन्या / कार्यालयांना मात्र या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. पण या सर्व कार्यालयांशी निगडित विविध कामांसाठी गरज भासणाऱ्या आयडी / पासपोर्ट फोटोसाठी आवश्यक असणाऱ्या फोटो स्टुडिओना मात्र या निर्बंधामधून कोणतेही सूट देण्यात आलेली नाही, ज्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. यासाठी फोटो स्टुडिओ व्यावसायिकांचा समावेश व्हावा.
निवेदनाच्या प्रत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले.