लिंबांची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:47+5:302021-05-06T04:41:47+5:30

सातारा : उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबू सरबताला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून मागणी केली जात आहे. परिणामी, येथील बाजारपेठेत लिंबांची खरेदी-विक्री वाढली ...

The demand for lemons increased | लिंबांची मागणी वाढली

लिंबांची मागणी वाढली

Next

सातारा : उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबू सरबताला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून मागणी केली जात आहे. परिणामी, येथील बाजारपेठेत लिंबांची खरेदी-विक्री वाढली आहे. दहा रुपयांना दोन लिंबांची विक्री विक्रेत्यांकडून होत आहे. शहरात कडक लॉकडाऊन लावल्याने हे दर वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत.

बचत गटांची लगबग

सातारा : उन्हाळा ऋतू असल्यामुळे उन्हाळी पदार्थ बनविण्यासाठी सध्या ग्रामीण व शहरी भागांतील बचत गटांतील महिलांची लगबग सुरू आहे. कुरवड्या, भातवडी, चटणी, लोणचे असे पदार्थ बनवून त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. त्यातून बचत गटांना पैसे मिळतात. कोविड सुरक्षेचे नियम पाळून हे काम सुरू आहे.

मोकाट जनावरांचा त्रास

सातारा : साताऱ्यात मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून अनेकदा ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहे. नागरिकांबरोबरच वाहनधारकांनाही याचा नाहक त्रास होत आहे. या जनावरांना हाकलण्याचे कामही बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना करण्याची वेळ आली आहे.

कलिंगडाला मागणी

सातारा : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शीतपेयांबरोबर गारवा देणारी कलिंगडे व टरबुजे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. रस्त्याशेजारी उभे राहून आस्वाद घेणं लॉकडाऊनमध्ये शक्य नसलं तरीही नागरिक कलिंगड फ्रीजमध्ये ठेवून घरातच खाण्याचा आनंद घेताना दिसतात.

..................

Web Title: The demand for lemons increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.