आंब्यांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:47+5:302021-05-29T04:28:47+5:30

सातारा : सध्या उन्हाळ्याचा हंगाम असल्याने काही दिवसांपूर्वी आंब्यांची आवक वाढली होती. त्यामुळे त्यांना कडक निर्बंधापूर्वी मोठ्या प्रमाणावर मागणी ...

Demand for mangoes | आंब्यांना मागणी

आंब्यांना मागणी

Next

सातारा : सध्या उन्हाळ्याचा हंगाम असल्याने काही दिवसांपूर्वी आंब्यांची आवक वाढली होती. त्यामुळे त्यांना कडक निर्बंधापूर्वी मोठ्या प्रमाणावर मागणी होती. विदेशी किंवा परराज्यांतून कितीही प्रकारची फळे आली, तरीही महाराष्ट्रातील फळांची सर कशालाच नाही. लॉकडाऊन असला तरी अनेक ठिकाणी आंबे विकले जात आहेत.

0000000

गर्दी टाळण्याची गरज

सातारा : कोरोना रुग्णांची संख्या राज्यासह जिल्ह्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगसह प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळेच सातारकरांनी निर्बंध उठले तरीही गर्दी न करता, सूचनांचे पालन करत कोरोनाचा धोका कमी करणे आवश्यक आहे.

०००

रसवंतीगृहे ओस

सातारा : उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने रसवंती गृहांमध्ये गर्दी होऊ लागली होती. उन्हापासून थोडासा गारवा मिळावा म्हणून ग्राहकांची पावले रसवंती गृहांकडे वळू लागली होती. मात्र, काेरोनाविषयक निर्बंध कडक केलेले असल्याने हा व्यवसायही बंद आहे. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

000000

वीजपुरवठा सुरळीत

सातारा : येथे दर मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित केला जातो. मात्र, गेल्या मंगळवारी सर्वच भागातील विद्युत पुरवठा सुरळीत होता. त्यामुळे सातारकरांना दिलासा मिळाला. विजेला मागणी वाढत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

0000

वेळेवर पगार करण्याची मागणी

सातारा : शहरातील जम्बो कोविड सेंटरमधील सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी अश्विन बडेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे. कोरोना उद्रेक काळात आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवल्याने त्वरित भरती प्रक्रिया राबवून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले होते. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केलेल्या या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्यावा, अशी मागणी होत आहे.

0000

खड्डा बुजवला

सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर पालिकेकडून येऊन तहसील कार्यालयाच्या समोर मिळतो, त्याठिकाणी मोठ्या आकाराचा खड्डा पडला होता. तो संबंधित विभागाने बुजवला आहे. याठिकाणी वाहने खड्ड्यात आदळत असत. तसेच हा खड्डा चुकविण्यासाठी वाहन बाजूला घेतल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. ती कोंडी आता खड्डा बुजविल्यामुळे कमी झाली आहे. वाहनचालकांतूनही समाधान व्यक्त केले जात आहे. इतर ठिकाणचे काम करण्याची मागणी होत आहे.

00000000

सेवा रस्त्यांची दुरवस्था

सातारा : महामार्गाप्रमाणेच सेवा रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. विशेषत: आनेवाडी टोलनाका ते सातारा या दरम्यानच्या दोन्ही बाजूंचे सेवा रस्ते जागोजागी उखडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. लिंब खिंड परिसरात तर सेवा रस्त्यांची चाळण झाली आहे. या सेवा रस्त्यांवर उखडलेली खडी अपघाताला निमंत्रण देत आहे. दोन्ही बाजूंचे सेवा रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी या रस्त्यालगतच्या नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.

00000

रस्ता दुरुस्तीची मागणी

सातारा : गेंडामाळ नाका ते शाहूपुरी दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, रस्त्यावर सतत रहदारी असल्याने खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

००००००

व्यंकटपुरा पेठेत निर्जंतुकीकरण

सातारा : साताऱ्यातील व्यंकटपुरा पेठेत काही दिवसांपासून काेरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात आणखी संसर्ग वाढू नये, म्हणून सातारा पालिकेच्यावतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. यासाठी अग्निशमन बंबातून फवारणी करण्यात आली.

२८ सातारा पालिका

Web Title: Demand for mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.