गोपूज-पुसेसावळी रस्त्याची झुडपे हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:20+5:302021-06-25T04:27:20+5:30

औंध : प्रमुख रहदारीचा मार्ग असलेल्या गोपूज-पुसेसावळी रस्त्याच्या दुतर्फा झुडपे वाढली आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूचा अंदाज लावणे ...

Demand for removal of bushes on Gopuj-Pusesavali road | गोपूज-पुसेसावळी रस्त्याची झुडपे हटविण्याची मागणी

गोपूज-पुसेसावळी रस्त्याची झुडपे हटविण्याची मागणी

Next

औंध : प्रमुख रहदारीचा मार्ग असलेल्या गोपूज-पुसेसावळी रस्त्याच्या दुतर्फा झुडपे वाढली आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूचा अंदाज लावणे वाहनधारकांना अडचणीचे ठरत असल्याने ही झुडपे संबंधित विभागाने हटवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गोपूज-पुसेसावळी रस्त्यावरून वाहनांची कायम वर्दळ असते. अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. हा रस्ता पुसेसावळीपासून कडेपूर, कऱ्हाड, कोल्हापूर, तर गोपूजपासून वडूज, दहिवडी म्हसवडला जात आहे. गोपूजनजीक कारखाना असल्याने दुचाकीस्वार, ट्रॅक्टर वाहतूक, टँकरची वाहतूकही लक्षणीय असते.

पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यांच्या बाजूंची झुडपे बहरली आहेत.

यामध्ये काही काटेरी झुडपेही आहेत. ही झुडपे रस्त्याच्या दुतर्फा पसरली आहेत, तर पेट्रोल पंपाजवळील फरशी पुलावरची सुरक्षेसाठी लावण्यात येणारी दगडेही दिसत नाहीत. साइडपट्ट्याही व्यवस्थित दिसत नसल्याने, तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना गाडी क्रॉस होताना अंदाज येत नसल्याने खाली कोणी उतरायचे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे वाढलेली झुडपे हटविण्याची मागणी होत आहे.

फोटो : २४औंध-रोड

गोपूज-पुसेसावळी रस्त्याकडेची वाढलेली झुडपे हटविण्याची मागणी होत आहे. (छाया : रशिद शेख)

Web Title: Demand for removal of bushes on Gopuj-Pusesavali road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.