राजाळेत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:23+5:302021-07-11T04:26:23+5:30

फलटण : राजाळे (ता. फलटण) वीज वितरण केंद्रातून राजाळे व परिसरातील गावांमध्ये शेती पंपासाठी होणारा वीज पुरवठा अतिरिक्त वीज ...

Demand for smooth power supply in Rajale .. | राजाळेत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी..

राजाळेत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी..

Next

फलटण : राजाळे (ता. फलटण) वीज वितरण केंद्रातून राजाळे व परिसरातील गावांमध्ये शेती पंपासाठी होणारा वीज पुरवठा अतिरिक्त वीज वापरामुळे वारंवार खंडित होत असल्याने विजेअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी राजाळे वीज केंद्राची क्षमता वाढवावी, अशी मागणी शंभू सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष निखिल निंबाळकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

राजाळे वीज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये बागायती क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे या भागात शेती पंपाच्या विजेचा वापर एकाच वेळी शेतकरी करतात. त्यामुळे वीज मागणी व प्रत्यक्ष होणारा वापर यामध्ये फरक पडत असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, दिवसाआड वीज पुरवठा बंद करणे यामध्ये शेतकरी वर्ग व अधिकारी वर्गामध्ये खटके उडत आहेत. शिवाय शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. यामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी २२ केव्ही जानाई फिडर राजाळे या विद्युत वाहिनीची क्षमता वाढवून, आम्हाला अखंडपणे वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता, उपमुख्य कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Demand for smooth power supply in Rajale ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.