गुरसाळे येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:39 AM2021-04-22T04:39:40+5:302021-04-22T04:39:40+5:30
औंध : गुरसाळे, ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी माजी पंचायत समिती ...
औंध : गुरसाळे, ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य भरत जाधव आणि ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गुरसाळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र्राची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. सर्व सोयीसुविधांनीयुक्त असलेली इमारत सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, जवळ सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची उपचाराअभावी हेळसांड होत आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनावरील ताण अधिक वाढत आहे. गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत कोविड सेंटर सुरू केल्यास ग्रामस्थांना वेळेवर उपचार मिळू शकतात. निवेदनावर भरत जाधव यांच्यासह डॉ. बाळासाहेब झेंडे, भागवत जाधव, गोविंद काळे, सुरेश लंगडे यांच्या सह्या आहेत.