फलटणच्या बाजारात तरकारी रोपांना मागणी, शेतकरी तरकारी पिकांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:30 PM2018-07-12T13:30:56+5:302018-07-12T13:34:07+5:30
पावसाने उघडीप घेतल्यानंतर फलटण व परिसरात हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. पेरणी केलेले शेतकरी चिंता दूर करून इतर तरकरी पिकांच्या लागणीकडे वळले आहेत.
मलटण : पावसाने उघडीप घेतल्यानंतर फलटण व परिसरात हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. पेरणी केलेले शेतकरी चिंता दूर करून इतर तरकरी पिकांच्या लागणीकडे वळले आहेत.
या तरकरी पिकांमध्ये मिरची, कांदा, वांगी, घेवडा, पावटा, कोथिंबिर पालेभाज्या या पिकांची लागण सुरू आहे. यासाठी फलटणच्या बाजारात मोठ्या प्रमाणात रोपांची आवक झाली असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर रोपे खरेदी करत आहेत. यामध्ये व प्रामुख्याने कांदा, मिरची रोपांची आवक सर्वाधिक आहे.
फलटणच्या पूर्व भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी रोपे तयार करून बाजारात विक्रीसाठी आणतात. विडणी, धुळदेव, आलगुडेवाडी, निंबळक, बरडमधून अनेक शेतकरी रोपांची विक्री करण्यासाठी बाजारात येतात पाऊस चांगला झाल्याने रोपांचे उत्पादन चांगले झाले आहे. फलटणच्या आठवडी बाजारात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आशा रोपांची विक्री वर्षानुवर्षे केली जाते.
आयत्या रोपांची खरेदी करून लागण करणे शेतकऱ्याच्या दृष्टीने पडवरणारे आहे. लहान क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारातील तयार रोपे घेणे फायद्याचे ठरते.
-हनुमंत गुलदगड,
शेतकरी, नांदल