पितृपंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:29+5:302021-09-25T04:42:29+5:30
- पितृपंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. यामुळे विक्रेतेही घराजवळ येऊन भाज्या विक्री करताना दिसत आहेत. - गवारी, भोपळा, शेपू, ...
- पितृपंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. यामुळे विक्रेतेही घराजवळ येऊन भाज्या विक्री करताना दिसत आहेत.
- गवारी, भोपळा, शेपू, मेथी या भाज्यांना मागणी अधिक आहे. यामुळे दरातही वाढ झाली आहे.
- भाज्यांना मागणी वाढल्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळू लागले आहेत. तसेच बाजार समितीतही भाज्यांना दर मिळत आहे.
........................................................................
व्यापारी काय म्हणतात?
गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यातच सध्या पितृपंधरवडा सुरू झाला आहे. यामुळे काही भाज्यांना मागणी वाढली आहे. परिणामी भाज्यांचे दर वाढत चालले आहेत. आणखी काही दिवस भाज्यांना मागणी राहणार आहे. त्यानंतर भाज्यांचे दरही कमी होतील.
- रामचंद्र पवार
.......................................................
पितृपंधरवड्यामुळे गावरी, शेपू, भोपळ्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते आणि छोटे दुकानदार आमच्याकडून अशाच भाज्यांची मागणी करतात. मागणी वाढल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. पितृपंधरवडा संपेपर्यंत भाज्यांना आणखी भाव येणार आहे.
- शांताराम काळे
..........................................................
अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार!
गेल्या एक-दीड महिन्यापासून भाजीपाल्याचे दर वाढत गेले आहेत. कोबी आणि टोमॅटो सोडला, तर कोणतीही भाजी ४० रुपये किलोच्या खाली नाही. मंडईत दर कमी असतो; तर घराजवळील दुकानात भाव वाढवून घेतला जातो. पण, अर्धा-एक किलोसाठी मंडईत जाता येत नाही.
- कांचन पाटील, गृहिणी
...................
पितृपंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी वाढली. त्यामुळे दरातही वाढ झाली आहे. आम्ही दररोज ताजी भाजीच खरेदी करतो. त्यासाठी मंडईपेक्षा घराजवळील विक्रेत्यांकडूनच घेतो. सध्या भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते. पण, दूर जाण्यापेक्षा जवळच भाजी खरेदीला प्राधान्य देतो.
- रघुनाथ काकडे, ग्राहक
..........................................................