टरबुजाची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:52+5:302021-05-13T04:39:52+5:30
नदीपात्रात घाण सातारा : येथील वेण्णा नदीकाठाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नदीकाठावर शेवाळ व गवत वाढले असल्यामुळे नदीकाठी ...
नदीपात्रात घाण
सातारा : येथील वेण्णा नदीकाठाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नदीकाठावर शेवाळ व गवत वाढले असल्यामुळे नदीकाठी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधीमुळे येथे येणाऱ्या नागरिकांना आजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक नागरिक नदीपात्रात कचरा टाकत असल्याने नदीपात्राचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दिशादर्शक फलक गरजेचे
सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. परिणामी महामार्गावर लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. संबंधित विभागाच्या वतीने तातडीने दिशादर्शक व सूचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
पापड विक्रीसाठी उपलब्ध
सातारा : उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागातील महिला शेवया, सांडगे व पापड तयार करण्यात मग्न असल्याचे दिसत आहेत. हे पदार्थ सणांच्यावेळी वर्षभर खाद्यपदार्थ म्हणून आहारात वापरले जातात. बाजारात तयार रेडिमेड पदार्थही विकण्यासाठी ठेवले जात आहेत.
मैदानावर पडली ओस
सातारा : संचारबंदी आणि कोविडचे वाढते संक्रमण लक्षात घेता मुलांना घराबाहेर सोडण्यासाठी पालक तयार नाहीत. परिणामी क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्याची हौस असलेल्या अनेकांना सध्या घरकैदेत राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मैदाने ओस पडली आहेत.
..................