आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:38 AM2021-03-05T04:38:59+5:302021-03-05T04:38:59+5:30
सातारा : सामाजिक जीवनात भेडसावत असलेल्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आंदोलन करत असतात. यामध्ये अनेकदा खटलेही ...
सातारा : सामाजिक जीवनात भेडसावत असलेल्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आंदोलन करत असतात. यामध्ये अनेकदा खटलेही दाखल केले जातात. ते मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. वैभव मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात वैभव मोरे यांनी म्हटले आहे की, सामाजिक प्रश्नात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राजकीय पक्ष बंद पुकारणे, अधिकाऱ्यांना घेराव घालणे, मोर्चे, निदर्शने करून आंदोलन करत असतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटलेही दाखल केले जातात. ते वर्षानुवर्षे चालतात. परिणामी राजकीय आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत १६ डिसेंबर २०२० रोजी निर्णय झाला आहे. सातारा जिल्ह्यातही राष्ट्रवादीतर्फे अनेक आंदोलने झाली असून खटले प्रलंबित आहेत. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार आंदोलनातील खटले मागे घेण्यात यावेत.