लोकशाहीचा हुकमी एक्का; मतदानाचा वाढवा टक्का !

By admin | Published: February 20, 2017 11:43 PM2017-02-20T23:43:22+5:302017-02-20T23:43:22+5:30

विविध उपाययोजना : भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन

Democracy dictate; Increase percentage of votes! | लोकशाहीचा हुकमी एक्का; मतदानाचा वाढवा टक्का !

लोकशाहीचा हुकमी एक्का; मतदानाचा वाढवा टक्का !

Next



सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनोखे फंडे राबविले. क्यू आर कोडच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानाचे केलेले आवाहनही अनोखे ठरले. तसेच काही शाळांनीही यासाठी पुढाकार घेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संकल्पना मांडल्या आहेत. जिल्ह्यात १९ लाख ६६ हजार ५८४ मतदार आहेत. या मतदारांनी भयमुक्त वातावरणात व उत्स्फू र्तपणे मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर २४ तास आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला. निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांमार्फत पैसे, मद्य, मोफत वस्तू यांचे वाटप यावर अंकुश ठेवण्यासाठी ३८ व्हिडिओ सर्व्हिलियन्स पथके, ३७ स्टॅटिस्टिक सर्व्हिलियन्स पथके, ३७ फ्लार्इंग स्कॉड पथके अशी एकूण ११२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आचारसंहिता भंगबाबत ६६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. माण तालुक्यात १ व खंडाळा तालुक्यामध्ये २ हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपद्रवक्षम गावांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. परवानाधारक लोकांकडील शस्त्रे जमा करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये एकूण १९० मतदान केंद्र असून, सर्व संवेदनशील मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
मतदान कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचविणे व आणणेकामी एसटी बस, जीप, टेम्पो, ट्रक, लाँच, मिनीबस, क्रूझर अशा एकूण ६४२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाभरात एकूण २ हजार ५८४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, १ हजार ८४८ इमारती यासाठी घेण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर १६ हजार ९८२ कर्मचारी
क्षेत्रिय अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई असे एकूण १६ हजार ९८२ मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपअधीक्षक दर्जाचे १६ अधिकारी, ५१ पोलिस निरीक्षक, ११९ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, ३ हजार ४७५ पोलिस कर्मचारी, ७५० गृहरक्षक दलाचे जवान यांचा सहभाग असणार आहे. (प्रतिनिधी)
मतदान करा,
रेखाचित्रातून आवाहन
येथील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सिनर्जी नॅचरल स्कूलने आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेच्या मागील बाजूस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, सातारा यांच्या वतीने मतदार जनजागृतीबाबतचे रेखाचित्र प्रसिद्ध करून शासनाच्या विधायक कामात आपला सहभाग नोंदविला. हे इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

Web Title: Democracy dictate; Increase percentage of votes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.