'लोकशाही मूल्य जपणारे..... असामान्य नेतृत्व"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:12+5:302021-03-30T04:22:12+5:30
असामान्य नेतृत्व" ..आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ऊर्फ बाबाराजे.. ॲड. विक्रम पवार. सभापती, सातारा बाजार समिती शब्दांकन - सागर ...
असामान्य नेतृत्व"
..आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ऊर्फ बाबाराजे..
ॲड. विक्रम पवार.
सभापती, सातारा बाजार समिती
शब्दांकन - सागर नावडकर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशात जन्म घेऊन राजेशाहीचा थाट न दाखवता लोकशाहीच्या विचारांचा वसा व वारसा चालवणारे, वारसाने मिळालेली ‘राजेशाही’ कर्तबगारीने सिद्ध करणारे,धुरंधर राजकारणी, असामान्य समाजकारणी, व्यवहारज्ञान, पारदर्शकता, विचारांचा समतोल, अभ्यासूपणा, दूरदृष्टीने निर्णय घेणारे लोकनेते, राजकारणाच्या ध्रुवीकरणात भल्याभल्यांना पाणी पाजणारा अजिंक्यतारा म्हणजे.... सातारा जावली तालुक्याचे भाग्यविधाते जननायक श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे तथा बाबाराजे भोसले यांचा वाढदिवस आणि या निमित्ताने या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला शोध..
लोकप्रतिनिधी म्हणून पारदर्शकता जपणारे लोकनेते......
'सातारा' या नावाला एक ऐतिहासिक व सामाजिक अधिष्ठान आहे. समाजसेवेचा वसा घेऊन लोकसापेक्ष काम करणारे श्रीमंत छत्रपती भाऊसाहेब महाराज यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढून विविध समस्यांवर मात करत बाबाराजे यांनी विकासपर्वाला प्रारंभ केला. महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासात श्रीमंत छत्रपती भाऊसाहेब महाराज यांचे नाव नेहमीच चर्चेत व अग्रस्थानी राहिले आहे.अशा दिग्गजांच्या कुशीत व राजकीय मुशीत बाबाराजे यांचे व्यक्तिमत्त्व आकाराला आले आहे. त्यामुळेच ‘सर्वसामान्य माणूस’ हा त्यांच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेला दिसून येतो. लोकप्रतिनिधी म्हणून पारदर्शकता जपल्यामुळेच बाबाराजे सर्वसामान्यांच्या आदराचा घटक ठरले आहेत.
विकासात्मक दूरदृष्टी व विचारांचा समतोल
श्रीमंत छत्रपती भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या कार्यकालात शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून राजकारण व समाजकारण केलेले दिसून येते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून बाबाराजे यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना कार्यान्वित केलेल्या दिसतात. त्यामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा, खरेदी-विक्री संघ सातारा, अजिंक्यतारा फळे-फुले सहकारी संस्था इत्यादी माध्यमातून शेतकरी हिताच्या अनेक योजना यशस्वीरित्या कार्यान्वित केलेल्या दिसतात.
दिशादर्शक नेतृत्व
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणून बाबाराजे यांचे कार्य दिशादर्शक राहिलेली दिसते. सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन विकासाची गंगा सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असलेले दिसते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना या दोन्ही संस्था महाराष्ट्रातील सर्वोत्तम संस्थांमध्ये गणल्या जातात...
लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा राजा
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा व जावली तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगात सहभागी असतात. मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या कठीण प्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे मतदार संघातील लोकांच्यामध्ये बाबाराजेंबद्दल आत्मियता आहे.
आगामी राजकारणातील झंझावती नेतृत्व
दोन पिढ्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दरी पडू न देता आपल्या कार्यकौशल्याने ज्येष्ठांचा सन्मान करत योग्य त्या ठिकाणी युवावर्गाला संधी देऊन बाबाराजे यांनी सदैव समन्वय साधलेला दिसतो. लोकशाही मूल्यांची जाणीव बाबाराजेंच्या ठायीठायी जाणवते. प्रत्येक मतदार, छोट्यातला छोटा कार्यकर्ता यांची ते आदराने चौकशी करतात. सहकारात वाटचाल करत असताना सर्वमताची कदर करण्याचा त्यांचा गुण नेहमीच प्रशंसनीय ठरलेला आहे
या गुणांमुळेच सामान्य कार्यकर्ते व जनतेचे विपुल प्रेम बाबाराजे यांना सदैव लाभलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक दिशादर्शक झंझावात निर्माण झालेला दिसून येतो. राजकारण आणि समाजकारण करत असताना प्रत्येक कृती-उक्ती सर्वसामान्यांना समर्पित केलेली दिसून येते. सतत कार्यमग्न राहून व सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून बाबाराजे यांनी झंझावाती कार्याचा दीपस्तंभ निर्माण केलेला दिसून येतो.
आपले हे यश निर्विवाद राहो..... महाराष्ट्राच्या राजकारणात आपले नाव ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहो..... आई तुळजाभवानी चरणी मनःपूर्वक प्रार्थना.... आदरणीय कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ऊर्फ बाबाराजे यांना सातारा जावली मतदारसंघाच्या जनतेकडून वाढदिवसानिमित्त खूप-खूप शुभेच्छा...!