महाबळेश्वरमध्ये वेण्णालेक परिसरातील अवैध बांधकामे पाडण्यास सुरुवात, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By दीपक शिंदे | Published: November 2, 2023 01:19 PM2023-11-02T13:19:05+5:302023-11-02T13:19:53+5:30
महाबळेश्वर : येथील वेण्णालेक परिसरातील विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामांवर आज, गुरुवारी सकाळी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेकडून कारवाई करण्यास सुरूवात केली. ...
महाबळेश्वर : येथील वेण्णालेक परिसरातील विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामांवर आज, गुरुवारी सकाळी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेकडून कारवाई करण्यास सुरूवात केली. पालिका, महसुल, पोलिस अधिकाऱ्यांसह कर्माचारी वर्गाचा मोठा फौजफाट्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. वेण्णानदी पात्रातील बांधकाम कारवाई सुरु असलेल्या घटनास्थळी प्रांत राजेंद्रकुमार जाधव, तहसिलदार तेजस्विनी पाटील पालिकेचे प्रशासक योगेश पाटील तळ ठोकून होते.
अचानक सुरू झालेल्या कारवाईमध्ये नदी पात्रात असणाऱ्या काही बेकायदेशीर इमारतींवर नगरपालिकेचा हातोडा पडला. तर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक आल्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. एका इमारत मालकाने डिझेल अंगावर घेऊन पेटविण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन मोहिम थांबविण्यात आली.