तरडगावामध्ये बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:27+5:302021-08-13T04:44:27+5:30
तरडगाव : तरडगाव (ता. फलटण) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय फलटणमधील ...
तरडगाव : तरडगाव (ता. फलटण) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय फलटणमधील विद्यार्थी कृषीदूत आकाश गायकवाड याने बियाण्यांसाठी लागणाऱ्या बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले.
यामध्ये विविध बुरशीनाशक, जीवाणूसंवर्धक यांचा योग्य प्रमाणात वापर करून बीजप्रक्रिया केली. तसेच प्रक्रिया का करावी, हे सांगताना त्याचे फायदे व तोटेदेखील सांगितले. यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.डी. निंबाळकर, प्रा. एन.एस. धालपे, प्रा. एस.वाय. लालगे, प्रा. ए.एस. नगरे, प्रा. व्ही.पी. गायकवाड, प्रा. जी.एस. शिंदे, प्रा. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सतीश झुंजार, प्रवीण गायकवाड, मंथन गाडे, लहू सोनटक्के, किरण चव्हाण, विजय झुंजार, सुबोध पवार आदी उपस्थित होते.
फोटो- कृषीदूत आकाश गायकवाड याने तरडगावमधील शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवताना त्याचे फायदे व तोटे सांगितले.