डेंग्यू निवारणार्थ फलटणला आज ‘ड्राय डे’

By admin | Published: October 28, 2014 11:51 PM2014-10-28T23:51:06+5:302014-10-29T00:11:50+5:30

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सरसावली : वाठारस्टेशनमध्ये तापाचे आणखी १८ रुग्ण आढळले

Dengue Reservations Phaltanala today is called 'Dry Day' | डेंग्यू निवारणार्थ फलटणला आज ‘ड्राय डे’

डेंग्यू निवारणार्थ फलटणला आज ‘ड्राय डे’

Next

सातारा/फलटण : फलटण शहरात डेंग्यूसदृश साथीमुळे एकजण दगावला होता. तसेच शहरात साथीच्या संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण शहरात बुधवार, दि. २९ रोजी कोरडा दिवस (ड्राय डे) पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी पाणीसाठा करण्यात येत असलेली भांडी रिकामी करण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील वाठारस्टेशन ता. कोरेगाव येथे ऐन दिवाळीत साथीचे आजार पसरले आहेत. येथील रुग्णांची संख्या साडेतीनशेच्या घरात पोहोचली होती. ही घटना ताजी असताना कऱ्हाड तालुक्यातील महारुगडेवाडी व साळशिरंबे येथे गॅस्ट्रोसदृश साथ पसरली होती. याठिकाणीही आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याठिकाणी औषधोपचार करण्यात येत आहेत.
फलटण येथील साथीमुळे एकाचा मृत्यू झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा, फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय आणि फलटण पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. डेंग्यूचा फैलाव डासांपासून होतो. हे टाळण्यासाठी फलटणमध्ये बुधवारी कोरडा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, पालिका कर्मचारी, पोलीस यांची मदत घेण्यात येणार आहे. अकरा पथके तयार करुन पाण्याची सर्व भांडी स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक तेथे औषधांची फवारणी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती आरोग्य अधीक्षक डॉ. अधिकराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
फलटण शहरातील काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा सहा संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी सातारा जिल्हा रुग्णालय तसेच पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेस पाठविण्यात आले आहेत.
साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा साठा वाढविण्यात आला आहे. परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच कोणत्याही रोगांची लक्षणे आढळल्यास रुग्णांनी घाबरुन न जाता जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल होऊन उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

महारुगडेवाडीत ‘मेडिक्लोअर’चे वाटप
कऱ्हाड तालुक्यातील महारुद्रवाडी व साळशिरंबे येथे अतिसारसदृश रुग्ण आढलले आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साथीचे आजार पसरल्याची माहिती मिळताच दोन्ही गावात आरोग्य पथके रवाना केले आहेत. यामध्ये तीन दिवसांमध्ये महारुद्रवाडीत सात तर साळशिरंबे येथे तीन अतिसारसदृष्य रुग्ण आढळले आहेत. कुपनलिकेतील पाणी पिण्याने ते आजारी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर संबंधित गावातील ग्रामस्थांना मेडिक्लोअरचे आरोग्य विभागातर्फे वाटप करण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोर्बो यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

वाठारस्टेशनला नऊ आरोग्य पथके कार्यरत
वाठारस्टेशनमध्ये ऐन दिवाळीत पसरलेल्या साथीच्या आजारामुळे अनेकांची झोप उडाली आहे. याठिकाणी आतापर्यंत सुमारे साडेतीनशे तापाचे रुग्ण आढळले आहेत. यावर नियंत्रण करण्यासाठी गावात आरोग्य कर्मचाऱ्यांची नऊ पथके गावात फिरुन आरोग्य तपासणी करत आहे. यामध्ये आणखी अठरा रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी फलटणला पाठवून दिले आहेत.

१ फलटण शहरातून घरभेट देत असलेल्या आरोग्य पथकाने डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांचा प्रसार रोखण्यासाठी सर्वे केला
२ या पथकांनी फलटण शहरातील पाणीसाठा केलेली १,१४९ भांडी तपासली
३ या भांड्यांपैकी ४८ भाड्यांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या
४ त्यातील २५ भांडी या पथकाने रिकामी केली.
५पाणी भांड्यात न साठता डबके, इमारती खालील खड्ड्यांमध्ये पाणी साठले आहेत; पण पाणी काढणे शक्य नसल्याने त्याठिकाणी औषध फवारणी केली आहे.
जिल्ह्यातील तिन्ही ठिकाणची साथीचा अभ्यास करता स्वच्छतेचा अभाव असल्याचा जाणवले आहे. तसेच नुकताच पाऊस झाल्याने ही साथ पसरली आहे. त्यामुळे परिसर स्वच्छता व कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे.
- डॉ. दिलीप माने
जिल्हा आरोग्य अधिकारी
४जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी आज तातडीची बैठक घेऊन वाठारस्टेशनमधील जलस्त्रोत बंद करण्याच्या तसेच कुपनलिकांमधील पाणी तपासण्याच्या सूचना केल्या आहेत.


- रामदास गवार, बंदर निरीक्षक, जैतापूर

Web Title: Dengue Reservations Phaltanala today is called 'Dry Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.