हद्दपारीतील गुंडाला सापळा रचून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:46+5:302021-09-25T04:42:46+5:30

दहिवडी : माण, खटाव, फलटण, कोरेगाव या चार तालुक्यांतून हद्दपार असलेला दीपक नामदेव म्हसुगडे (वय २४, रा. नवलेवाडी, पो. ...

The deported goons were caught in a trap | हद्दपारीतील गुंडाला सापळा रचून पकडले

हद्दपारीतील गुंडाला सापळा रचून पकडले

Next

दहिवडी : माण, खटाव, फलटण, कोरेगाव या चार तालुक्यांतून हद्दपार असलेला दीपक नामदेव म्हसुगडे (वय २४, रा. नवलेवाडी, पो. मलवडी, ता. माण) याला मलवडी येथील एसटी स्टॅण्ड परिसरात फिरत असताना साफळा रचून पकडले.

याबद्दल पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, नवलेवाडी येथील दीपक म्हसुगडे या आरोपीस एक वर्षासाठी माण, खटाव, फलटण कोरेगाव या तालुक्यातून एक वर्षांसाठी तडीपार केले होते. तथापी तो मलवडी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तासगावकर यांचे पथक याच परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी त्यांना त्याचा सुगावा लागला. त्यानंतर सापळा लावून तडीपार असलेल्या म्हसुगडेला पकडण्यात आले. त्याच्यावर छोटे मोठे गुन्हे आहेत. रवींद्र बनसोडे तपास करीत आहेत.

Web Title: The deported goons were caught in a trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.