गंभीर गुन्हे नावावर असलेला प्रमोद सकट जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 07:29 PM2021-12-11T19:29:54+5:302021-12-11T19:30:12+5:30

प्रमोद सकट याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Deported from Pramod Sakat district in the name of serious crime | गंभीर गुन्हे नावावर असलेला प्रमोद सकट जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

गंभीर गुन्हे नावावर असलेला प्रमोद सकट जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

Next

सातारा :  शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकामागोमाग एक गुन्हे करणाऱ्या प्रमोद उर्फ बाळा काशिनाथ सकट (वय २६, रा.प्रतापसिंहनगर, सातारा) याला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद सकट याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तोजामिनावर बाहेर असून त्याच्याकडून गुन्हेगारी कृत्य सुरूच असल्याने पोलिसांनी त्याला अनेकदा सुधारण्याची संधी दिली होती. मात्र, त्याच्या वागण्यात काही फरक पडत नसल्याने व समाजात त्याच्यामुळे अशांतता पसरत असल्याने सातारा शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता.

त्यावर झालेल्या सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी त्याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपारी काळात संशयित सातारा जिल्ह्यात फिरताना दिसल्यास लोकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक  पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार सुजित भोसले, गणेश ताटे, राजुकांबळे, अविनाश चव्हाण, जोतीराम पवार आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Deported from Pramod Sakat district in the name of serious crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.