पाटण तालुक्यात ठेवीदारांच्या जीवाला घोर, अर्थकारण बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:55 PM2020-11-21T15:55:54+5:302020-11-21T15:58:34+5:30
bankingsector, sataranews पाटण तालुक्यातील अनेक शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या भविष्याची पुंजी म्हणून आर्थिक कुवतीनुसार स्वत:जवळचे पैसे विविध बँका व पतसंस्थांमध्ये गुंतवले आहेत. मात्र, आताच्या स्थितीत तालुक्यातील काही पतसंस्था ठेवीदारांचे मुदत संपलेल्या ठेवींचे पैसे परत करण्यास असमर्थता दाखवत आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या जीवाला घोर लागला आहे. पाटण तालुक्यातील अनेक शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या भविष्याची पुंजी म्हणून आर्थिक कुवतीनुसार स्वत:जवळचे पैसे विविध बँका व पतसंस्थांमध्ये गुंतवले आहेत. मात्र, आताच्या स्थितीत तालुक्यातील काही पतसंस्था ठेवीदारांचे मुदत संपलेल्या ठेवींचे पैसे परत करण्यास असमर्थता दाखवत आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या जीवाला घोर लागला आहे.
अरुण पवार
पाटण : तालुक्यातील अनेक शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या भविष्याची पुंजी म्हणून आर्थिक कुवतीनुसार स्वत:जवळचे पैसे विविध बँका व पतसंस्थांमध्ये गुंतवले आहेत. मात्र, आताच्या स्थितीत तालुक्यातील काही पतसंस्था ठेवीदारांचे मुदत संपलेल्या ठेवींचे पैसे परत करण्यास असमर्थता दाखवत आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या जीवाला घोर लागला आहे.
पाटण तालुक्याचा बहुतांशी परिसर दुर्गम आहे. तसेच येथील डोंगर पठारावर अनेक गावे आहेत. त्यामुळे कोणीतरी गावनेते सांगतो म्हणून अनेकांनी आपल्या जवळचे पैसे स्थानिक सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये गुंतवले आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक संस्था व बँकांचे कंबरडे मोडले आहे.
कर्जवाटप करताना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या अटीचे पालन न करता आणि आपल्या जवळील रिझर्व्ह फंड म्हणजेच राखीव निधी पुरेसा न ठेवता अनेक पतसंस्थांनी ठेवीदारांचे पैशाचे भरमसाठ कर्जवाटप केले. आणि अचानक कोरोना साथीमुळे अनेक कर्जदारांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्याचा परिणाम बँका आणि पतसंस्थांच्या नफ्यावर झाला आहे. त्यामुळे आता अनेक बँकांनी आणि पतसंस्थांनी कर्ज वाटप करणे बंद केले आहे. मात्र, ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी परत देण्यास काही पतसंस्था टाळाटाळ करू लागल्या असल्याच्या तक्रारी तालुक्याच्या विविध भागांतून होऊ लागल्या आहेत.
ठेवीदारांनी मुदत संपलेल्या ठेवीचे पैसे मागताच आज नाही उद्या देतो. अथवा निम्मे पैसे न्या आणि बाकीचे पुन्हा गुंतवा अशा विनवण्या होऊ लागल्या आहेत.
बजेट कोलमडले; धास्ती वाढली
कोरोना संसर्ग, अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस या तिहेरी संकटामुळे सध्या शेतकऱ्यांसह उद्योजक, व्यावसायिक मोठ्या अडचणीत आहेत. अनेकांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे बँक, पतसंस्थांमध्ये यापूर्वी ठेवलेल्या ठेवीचे पैसे परत मिळवून पुन्हा उभारी घेण्याचा अनेकजण प्रयत्न करीत आहेत. मात्र, पतसंस्थांकडून ठेवीचे पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने धास्ती वाढली आहे.
पाटण तालुक्यात ठेवीदारांचे पैसे परत करण्यास जर कोणती संस्था टाळाटाळ करत असेल तर ठेवीदारांनी आमच्याकडे तक्रार करावी. काही महिन्यांपूर्वी एका संस्थेबाबत ठेवीदारांच्या तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जात आहे.
- एस. डी. पवार,
सहायक निबंधक, पाटण