कर्जमाफी ही लबाडाच्या घरचं आवतण : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:53 AM2017-11-26T01:53:22+5:302017-11-26T01:55:19+5:30
कºहाड : ‘शेतकºयांचा सातबारा कोरा करतो म्हणणाºयांनी अद्याप शेतकºयांना दमडीही दिलेली नाही. कर्जमाफीचा निर्णय प्रलंबित आहे.
कºहाड : ‘शेतकºयांचा सातबारा कोरा करतो म्हणणाºयांनी अद्याप शेतकºयांना दमडीही दिलेली नाही. कर्जमाफीचा निर्णय प्रलंबित आहे. रोज नवे नियम लादून शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात आहे. कर्जमाफी करण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे सरकारचा कर्जमाफीचा निर्णय म्हणजे लबाडाघरचं आवतणंच आहे,’ असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
कºहाड येथे शनिवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले, ‘ओठात राम आणि पोटात नथुराम’ या प्रकारची भाजप सरकारची वृत्ती आहे. आज ते यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी खोटा कळवळा दाखवत आहेत. जाहिरातबाजीच्या माध्यमातून कर्जमाफीचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शेतकºयांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ग्रीन, रेड, यलो यादीच्या माध्यमातून शेतकºयांची थट्टा केली जात आहे. २०१४ मध्ये आम्ही सत्ता सोडली तेव्हा राज्यावरील कर्जाचा आकडा २ लाख ५२ हजार कोटींचा होता. त्यामध्ये सरकारने तीनच वर्षांत तब्बल दीड लाख कोटींची भर घातली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत दिलेले आश्वासन पाळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील कोणताही घटक सरकारवर समाधानी नाही.’
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘एक डिसेंबरपासून यवतमाळ ते नागपूर पायी मोर्चा काढून सरकारविरुद्ध आंदोलनाचा एल्गार करणार आहोत. केंद्र तसेच राज्य सरकारने जनतेचा पुरता अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटक नाराज आहेत. शिवसेना आंदोलनांचा दिखावा करत असली ती सत्तेचा मोह सोडू शकत नाही. संपूर्ण देशात मोदी लाट थोपवण्याचे काम सातारा जिल्ह्णानेच केले होते. यापुढेही सरकारला घालवण्यात सातारा जिल्ह्णाचाच पुढाकार असेल.’
माजी मंत्री जयंत पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
कर्मवीर चौकात झाली सभा
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर प्रीतिसंगमावर हल्लाबोल आंदोलन सुरू करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रीतिसंगमावरून पायी चालत चावडी चौक, आझाद चौक, यशवंत हायस्कूलमार्गे दत्त चौकात आले. त्याठिकाणी छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वजण कर्मवीर चौकात गेले. त्याठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
आंदोलनात बैलगाडी, आसुड
हल्लाबोल आंदोलन प्रभावी करण्यासाठी आंदोलनात बैलगाडी व आसुडही आणण्यात आला होता. प्रीतिसंगमावरून ही बैलगाडी आंदोलनाच्या अग्रभागी होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: या बैलगाडीत बसले होते. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
... आणि विरोधी पक्षात जागाही!
शिवसेनेची दुटप्पी भूमिका असून, सत्तेत राहून सरकारला विरोध करणे ही जनतेची दिशाभूल आहे. मात्र जनता हे सर्व जाणून आहे. त्यांना सत्तेची ऊब पण हवी आहे, विरोधी पक्षात जागाही पाहिजे. सर्व आधाशासारखे घेण्याचा शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न आहे.
कोकणातील जागा काँग्रेसची, आमचा पाठिंबा!
कºहाड : ‘कोकणातील विधान परिषदेची जागा काँग्रेसची आहे. तो जे उमेदवार देतील, त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. समविचारी पक्षाच्या मताची विभागणी होऊ नये, त्याचा फायदा भाजपासारख्या जातीयवादी पक्षाला होऊ नये हे माझे मत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीच्या साक्षीने व्यक्त करतो,’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कºहाड येथे शनिवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.