जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा उपमुख्यमंत्री घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:43+5:302021-05-27T04:41:43+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोना संकट कायम असून या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी साताऱ्यात ...
सातारा : जिल्ह्यात कोरोना संकट कायम असून या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी साताऱ्यात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे हेही उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संकट कायम आहे. तसेच रुग्ण संख्या वाढलेलीच आहे. त्यामुळे याबाबत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत.
कोरोना रुग्णाची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रभावी पद्धतीने प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २८ रोजी सायंकाळी ७ वाजता बैठक होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ही बैठक होईल. यावेळी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.
.........................................................................