देसाई-पाटणकर गटांत लढत!

By admin | Published: June 25, 2015 10:46 PM2015-06-25T22:46:04+5:302015-06-25T22:46:04+5:30

पाटण तालुका : ९५ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक ,माण तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींची निवडणूक

Desai-Patankar groups fighting! | देसाई-पाटणकर गटांत लढत!

देसाई-पाटणकर गटांत लढत!

Next

पाटण : तालुक्यातील तब्बल ९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १३ जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता पासूनच गावागावांमध्ये रात्रबैठका, गटातटाची चाचपणी आणि सरपंच कोणाला करायचं, याचे आखाडे बांधण्यास सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी पाटण तालुक्यातील आजी-माजी आमदारांचे सल्ले घेण्यासाठी नेत्यांच्या निवासस्थानी गावातील पुढारी जाऊ लागले आहेत.
पाटण तालुक्यातील आडदेव, वजरोशी, असवलेवाडी, नाडोली, आटोली, वाझोली, बोडकेवाडी, नावडी, धावडे, काठणे, नेरळ, गोषटवाडी, टेळेवाडी, चाफोली, पापर्डे खुर्द, जरेवाडी, वांझोळे, चव्हाणवाडी, पवारवाडी, काहीर, बाचोली, चिटेघर, सळवे, कातवडी, चोपडी, सातर, पिंपळगाव, धामणी, दिवशी खुर्द, शिंदेवाडी, खळे, गोकुळ तर्फ पाटण, हावळेवाडी, सोनाईचीवाडी, कोचरेवाडी, करपेवाडी, हुंबरळी, सोनवडे, कोळेकरवाडी, कसणी, जानुगडेवाडी, सुळेवाडी, मणदुरे, कवडेवाडी, काळगाव, तारळे, मुंद्रुळहवेली, खोनोली, काळोशी, त्रिपुडी, मस्करवाडी, मानेवाडी, कामरगाव, उमरकांचन, मुरुड, निगडे, कोळोलीवाडी, कोतावडे, नावेल, पाळशी, खिवशी, सांगवड, पाचगणी, पिंपळोशी, कोकिसरे, चिखलेवाडी, पाठवडे, सुपुगडेवाडी, कोरावळे, चोपदारवाडी, पेठ शिवापूर, तामिणे, कुंभारगाव, दिवशी बुद्रुक, शिंद्रुकवाडी, तामकडे, कुठरे, टोळेवाडी, सुरूल, ठोमसे, नालोशी, बांबवडे, विरेवाडी, आंबवणे, मेंढोशी, घाटोळे, वाघजाईवाडी, आंबळे, मुळगाव अशा ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ आॅगस्ट रोजी होत आहेत.
पाटण तालुक्यात इतर निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायती निवडणुकीला महत्त्व दिले जाते. विद्यमान आमदार शंभूराज देसाई व माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे पूत्र सत्यजित पाटणकर यांच्यात विधानसभेला लढत झाली. त्यामध्ये १८,८२४ मताच्या फरकांनी आमदार देसाई विजयी झाले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. (प्रतिनिधी)

शेताच्या बांधावर रंगणार गावगप्पा...
पाटण तालुक्यात पावसाळा म्हटलं की खरीप हंगामाचे दिवस असतात. या काळात सर्व शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात राबतात. त्यातच गावातील निवडणुका लागल्याने गाव पुढाऱ्यांच्या गप्पा या शेतातील बांधावर रंगणार आहेत. त्यामुळे आगामी दोन महिने पाटण तालुक्यात राजकीय गप्पांना अधिक जोर येणार आहे.


माण तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींची निवडणूक
म्हसवड : माण तालुक्यात जिल्हा बँक निवडणुकीने तापलेले वातावरण थंड होते ना होते तोच तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींपैकी ५७ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, भाजपा, शिवसेना हे महायुतीतील घटक पक्ष युती करून निवडणुकीस सामोरे जाणार का? वेगवेगळे लढणार? यावर तिरंगी का बहुरंगी लढती होणार हे अवलंबून आहे.
माण तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामधील राजकीयदृष्ट्या संवदेनशील असणाऱ्या दहिवडी, गोंदवले बु, गोंदवले खु, मार्डी, जांभुळणी, कुकुडवाड, लोधवडे, वरकुटे-म्हसवड, शेनवडी, वडजल, काळचौंडी, पिंपरी, पिंगळी बु।।, पळसावडे या ग्रामपंचायतींसह भालवडी, शिंदी खुर्द, गटेवाडी, पर्यंती, भाटकी, शिरवली, शेवरी, पुकळेवाडी, बोडके, स्वरूपखानवाडी, राजवडी, डंगिरेवाडी, तोंडले, हवालदारवाडी, राणंद, दिवडी, वडगाव, हिंगणी, शंभुखेड, शिंदी बुदु्रक, हस्तनपूर, वाघमोडेवाडी, सोकासन, जाशी, वाकी, खडकी, श्रीपालवन, कारखेल, बोथे, टाकेवाडी, किरकसाल, कुळकजाई, थदाळे, मोगराळे, भांडवली, वळई, मोही, ढाकणी, येळेवाडी, पिंगळी खुर्द, धामणी, पानवण, गंगोती या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत.
तालुक्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींवर आमदार जयकुमार गोरे, पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, माजी आमदार सदाशिवराव पोळ गटाच्या विचारांची सत्ता आहे. सद्य:स्थितीत दोन्ही गोरे बंधूंच्या भोवतीच तालुक्याचे राजकारण फिरताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Desai-Patankar groups fighting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.