शिवसह्याद्री पायदळाची ऐतिहासिक झेप; भारावली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:29 PM2020-02-28T23:29:19+5:302020-02-28T23:31:14+5:30

खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने सिंहगड ते रायगड असा अनोखा पायी प्रवास ट्रेकिंगचे नियोजन बांधकाम अभियंता श्रीपाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यामध्ये ४० शिलेदार सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी आतकरवाडी मार्गे सिंहगड चढाई करून कल्याण दरवाजाने विंझर

The desert footpath between Sinhagad and Raigad | शिवसह्याद्री पायदळाची ऐतिहासिक झेप; भारावली तरुणाई

खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सच्या जवानांनी सिंहगड ते रायगड असा अनोखा पायी प्रवास केला.यामध्ये सर्व रानवाटा तुडवल्या.

googlenewsNext
ठळक मुद्देसिंहगड ते रायगड दरम्यानच्या रानवाटा पादाक्रांत चाळीस मावळे सहभागी :

खंडाळा : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य सह्याद्रीच्या डोंगररांगातील कडेकपारी, घनदाट अरण्य आणि बळकट गड किल्ल्यातून विस्तारले. शिवरायांचा हाच ठेवा प्रत्यक्ष पाहण्याचा ध्यास घेऊन इतिहासाचा वारसा जपण्यासाठी खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने ऐतिहासिक झेप घेतली. सिंहगड-राजगड-तोरणा-बोराट्याची नाळ-रायगड असा तब्बल ८२ किलोमीटरच्या रानवाटा तीन दिवसांत पादाक्रांत करीत स्वच्छता मोहीम राबविली.

खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने सिंहगड ते रायगड असा अनोखा पायी प्रवास ट्रेकिंगचे नियोजन बांधकाम अभियंता श्रीपाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यामध्ये ४० शिलेदार सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी आतकरवाडी मार्गे सिंहगड चढाई करून कल्याण दरवाजाने विंझर गावाकडे उतरले. विंझर ते गुंजवणी पायी प्रवास व पुढे राजगड चढाई करून संजीवनी माचीवरून पालखिंडीत उतरून ३२ किलोमीटरच्या अथक प्रवासानंतर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पाल खिंड ते बुधला माचीवरून तोरणा किल्ला व पुढे कानंद खिंडीत उतरून गेळवणी मार्गे मोहरी गावात सुमारे २६ किलोमीटरचा प्रवास करून मुक्काम करण्यात आला.

तिस-या दिवशी मोहरी ते रायलिंग पठार, बोराट्याची नाळ, लिंगाणा किल्ल्याला वळसा घालून पाणेगाव दरीतून उतरून पुढे रायगडवाडी मार्गे रायगड किल्ला चढाई केली. त्यानंतर चित्त दरवाजाने खाली येणे हा सुमारे २४ किलोमीटरचा प्रवास अतिशय दिमतीने पूर्ण केला .

तीन दिवसांच्या क्षमतेपेक्षा अधिकचे अंतर असल्याने अंतिम टप्प्यात काहींच्या पायांना फोड तर गुडघ्यांना चमक असताना छत्रपती शिवरायांच्या समाधी दर्शनाची आस बाळगून मोठ्या जिद्दीने हा ट्रेक सदस्यांनी पूर्ण केला. त्यानंतरही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.


ध्यास स्वच्छतेचा .....
गडकोट ट्रेकिंगमधून प्रत्येक गडावर या ग्रुपच्या माध्यमातून सफाई मोहीम राबवली जाते. गडावरील पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक कचरा व इतर कचरा जमा करून तो मोठ्या पिशव्यातून भरून गडाखाली आणला. त्याची योग्य निचरा केला जातो. त्यामुळे स्वच्छतेचा ध्यास घेऊन केलेल्या कामामुळे किल्ल्यांची स्वच्छता राखण्यास मदत होते.
 

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाची जाणीव मनामध्ये राहावी तसेच गडकिल्ल्यांची स्वच्छता राहावी, यासाठी ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन केले जाते. याबरोबर शारीरिक स्थिती मजबूत राहण्यास मदत होते. याशिवाय रोजच्या धावपळीतून वेगळं काही केल्याचा आनंदही मिळतो.
- श्रीपाद जाधव, संस्थापक शिवसह्याद्र्री पायदळ ट्रेकर्स

 

Web Title: The desert footpath between Sinhagad and Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.