गोखळीत कोरोना हद्दपारीचा तरुणांकडून निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:24+5:302021-05-17T04:37:24+5:30
मलटण : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी गोखळी ग्रामपंचायत व लोकसहभागातून ...
मलटण : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी गोखळी ग्रामपंचायत व लोकसहभागातून तरुणांनी एकत्र येऊन गोखळी ग्रामपंचायतीचे नवीन इमारत व प्राथमिक शाळेत २० बेडचा कक्ष सुरू करण्यात आला आहे. गावातून कोरोना हद्दपारीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच थांबत आहेत. सर्वसामान्यांना घरात जास्त माणसे असतील तर इतरांनाही संसर्ग होऊन वयोवृद्ध रुग्णांना धोका पोहोचू शकतो. आसपास संसर्ग वाढ होऊ नये यासाठी गावातच विलिनीकरण कक्ष सुरू करण्यात आला. यासाठी करण्याची तयारी दर्शवली.
कक्षामध्ये दाखल झालेल्या रूग्णांना वैद्यकीय तपासणीसाठी दररोज डॉ. शिवाजी गावडे, डॉ. अमोल आटोळे, डॉ. नितीन गावडे, डॉ. विकास खटके, गोखळी आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सानिया शेख, आरोग्य सेविका लोंढे, आशा वर्कस, दुर्गा आडके रुग्णांना वेळोवेळी भेट देऊन आरोग्य तपासणी करून मोलाचे योगदान देत आहेत. रक्ततपासणी सोमनाथ वायसे, गोरख हरिहर यांनी करून देण्यात येईल असे सांगितले. गोखळीचे माजी सरपंच नंदकुमार गावडे यांनी रुग्णांना लागणारी औषधे देतात. रुग्णांना दररोज दीपक चव्हाण यांनी कोरोना विलीनीकरण कक्षातील रुग्णांना पिण्याचे कोमट पाणी आणि अंघोळीसाठी गरम पाण्यासाठी गॅस शेगडी दिली आहे. रुग्णांना चहा, नाष्टा पोहोच करतात. रुग्णांना जेवण घरून डबा येतो. कोरोना रुग्णांसाठी दोन वेळा चहा, सकाळी फळे, औषधे दिली जातात. या विलीनीकरण कक्षासाठी आणखी काही वस्तू साहित्याची गरज असेल तर गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने त्वरित करतात.
हा कोरोना विलीनीकरण कक्ष उभारण्यासाठी सरपंच सुमनताई गावडे, उपसरपंच डॉ. अमित गावडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, माजी उपसरपंच राधेश्याम जाधव, ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगताप, शांताराम गावडे, पोलीस पाटील विकास शिंदे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर गावडे, ग्रामविकास अधिकारी गणेश दडस यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
160521\img-20210516-wa0173.jpg
===Caption===
गोखळी ता फलटण येथे तरुणांनी लोकसहभागातून उभारले विलगिकरण कक्ष