मलकापुरात कोरोनामुक्त शहरचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:30+5:302021-05-25T04:43:30+5:30
पालिका नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या ...
पालिका नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी येथील पालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीत कोरोनामुक्त शहरचा निर्धार करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता, रुग्णांची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यांच्या आदेशाने दिनांक २५ मे ते १ जून या कालावधीत सातारा जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू झाले आहेत. या कालावधीत कडक लॉकडाऊन केला असून, जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत केवळ वैद्यकीय कारणाशिवाय किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या अनुषंगाने मलकापूर शहरातही कडक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने नियोजनासाठी सोमवारी नगराध्यक्ष नीलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांच्यासह प्रभाग अध्यक्ष व नगरसेवक प्रशांत चांदे, नूरजहान मुल्ला, आनंदी शिंदे, राजेंद्र यादव, कमल कुराडे, शकुंतला शिंगण, सागर जाधव, अजित थोरात, आनंदराव सुतार, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, प्रभागनिहाय नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
या बैठकीत मलकापूर शहरामध्ये कडक उपाययोजना राबविण्याचे ठरविण्यात आले. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर निर्बंध घालण्याच्या दृष्टीने शहरातील नऊ ठिकाणी तपासणी नाके लावण्याचा निर्णय झाला. याठिकाणी पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची नियंत्रणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शहरातील दाट वस्ती असणाऱ्या भागातील सर्व रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मलकापूर शहर कोरोनामुक्त करण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी केले आहे.
चौकट
तर... कोरोना चाचणी व १४ दिवस विलगीकरण
केवळ वैद्यकीय कारणास्तव इतरत्र जाण्याची सूट देण्यात येणार आहे. त्याशिवाय शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात येणार असून, अशा नागरिकांना १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याचा ठराव एकमुखी करण्यात आला आहे.
फोटो आहे..
२४ मलकापूर बैठक
मलकापुरातही कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी नगराध्यक्ष नीलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली. या बैठकीला उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (छाया : माणिक डोंगरे)
===Photopath===
240521\dsc_0461.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
मलकापूरातही कडक लॉकडाऊनच्या अमलबजावणीसाठी सोमवारी नगराध्यक्षा निलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली. या बैठकीस उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (छाया माणिक डोंगरे)