कापशीकरांचा ‘ओढाजोड’चा निर्धार
By Admin | Published: May 24, 2017 11:17 PM2017-05-24T23:17:56+5:302017-05-24T23:17:56+5:30
कापशीकरांचा ‘ओढाजोड’चा निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क
आदर्की : फलटण पश्चिम भागातील कापशी गावाने दुष्काळाचे चटके अन् पाण्यासाठी रात्र जागून काढत असताना पाण्याचे महत्त्व ओळखून श्रमदानातून १० वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा वाढला. त्यामुळे ओढ्याला वाहून जाणारे पाणी ओढा जोड प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाला शासनाने मंजुरी देऊन कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांचे हस्ते करण्यात आला. कापशी, ता. फलटण गावाला दहा वर्षांपूर्वी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी गावातील तरुणांनी एकत्र येऊन श्रमदानातून भूमिगत, गॅबियन, सिमेंट बंधारे, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून बांधले. यावेळी प.पू. रविशंकर यांनी कापशी गावास भेट दिली होती.
बंधाऱ्यामुळे कापशी गावचा पाण्याचा प्रश्न मिटला होता. परंतु कापशी गावचा काही भाग कोरडा राहत होता. त्या दरम्यान तीन वर्षांपूर्वी धोम-बलकवडीचे पाणी कापशीच्या ओढ्याला आलेने बंधारे तलाव भरुन वाहून जात होते. त्यासाठी शासनाकडे कापशी ग्रामस्थानी ओढा जोड प्रकल्प राबवण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. त्याची पहाणी व सर्वेक्षण करण्यात आले.
ओढा जोड प्रकल्पामुळे ४५० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने शासनाने फेबु्रवारी १७ मध्ये प्रकल्पास मंजुरी १६ लाख ९३ हजार रुपये मंजूर केले. त्यामुळे कापशी, टाकोबाईचीवाडी, सासवड व फलटण फायदा होणार आहे. सातारा व फलटण तालुक्यातील पहिला ओढा जोड प्रकल्पास शासन १०० टक्के खर्च करीत आहेत
कार्यक्रमास प्रा. सुभाषराव धुमाळ, पंचायत समिती सदस्य प्रतिभा धुमाळ, विनायक अनपट, दादासो खताळ, सरपंच मंदा सूळ, महेश अनपट, कुणाल झणझणे, विकास खताळ, दीपक कदम, श्रीरंग झणझणे, शाहूराज झणझणे, मंगेश वर्पे, भगवान कदम, यशवंत कदम, कापशी, टाकोबाईचीवाडी, सासवड ग्रामस्थ उपस्थित होते.