शासकीय योजना पोहोचविण्यास कटिबद्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:59+5:302021-07-07T04:47:59+5:30
पाचुपतेवाडी, ता. पाटण येथे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गावातील ५० ग्रामस्थांना नवीन रेशनकार्ड वाटप करण्यात आले, त्यावेळी ते ...
पाचुपतेवाडी, ता. पाटण येथे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गावातील ५० ग्रामस्थांना नवीन रेशनकार्ड वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, आबा चाळके, वनाधिकारी वसंतराव पाटील, पुरवठा निरीक्षक आष्टीकर, सरपंच आत्माराम पाचुपते, उपसरपंच स्वाती जाधव, सदस्य विवेक भोसले, लता मस्कर, सुजाता पाचुपते उपस्थित होते.
तहसीलदार योगेश्वर टोम्पे म्हणाले, पाचुपतेवाडी गाव चांगले काम करीत आहे. गाव स्थापनेपासून ग्रामपंचायत बिनविरोध असून गावात भांडण-तंटा बाजूला ठेवून सामाजिक कामासाठी ग्रामस्थ एकत्र येतात. ही गावासाठी चांगली बाब आहे. असेच एकत्र राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. कोरोनाच्या नियमांचे ग्रामस्थांनी पालन करावे. परगावाहून कोणी आले, तर कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे. कोरोनाचे नियम पाळून गाव कोरोनापासून मुक्त ठेवा. लसीकरण सर्वांनी करून घ्यावे.
यावेळी पंजाबराव देसाई, आत्माराम पाचुपते यांचे भाषण झाले. कृष्णा रुग्णालयात काम करणाऱ्या पल्लवी जाधव, जवान अमित जाधव यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. चंद्रकांत पाचुपते यांनी प्रास्ताविक केले. सुरेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आनंदराव जाधव यांनी आभार मानले.
फोटो : ०६केआरडी०३
कॅप्शन :
पाचुपतेवाडी, ता. पाटण येथे तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांच्याहस्ते शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.