विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून यंत्रणा विकसित : हेरकळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:25 AM2021-06-29T04:25:58+5:302021-06-29T04:25:58+5:30
वाई : ‘नवीन परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये. यासाठी रोटरी क्लब लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करीत आहे. ज्याद्वारे ...
वाई : ‘नवीन परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये. यासाठी रोटरी क्लब लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करीत आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पाठाचे नियोजन, मूल्यमापन, सरल व शासनाला आवश्यक अहवाल उपलब्ध होतील,’ अशी माहिती नवनिर्वाचित प्रांतपाल स्वाती हेरकळ यांनी केले.
वाई येथे वाई रोटरी क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी उपाध्यक्ष दीपक बागडे, राजेंद्र धुमाळ, प्रशांत पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेरकळ म्हणाल्या, ‘गुणवत्तापूर्ण साक्षरता या विषयावर रोटरी क्लबचा कटाक्ष आहे. यंत्रणेमुळे विद्यार्थी दूरचित्रवाहिनीला टॅब जोडून स्वतः अभ्यास करू शकतील. शिक्षक प्रशिक्षणात ८५ हजार शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आहे.
या वेळी विठ्ठल माने, सारिका मोरे, किरण पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात नामदेव पोटकुले, राजेंद्र जाधव, किरण पवार, सुनीता वैराट, संजय वाघमारे, प्रमिला राठोड, संतोष भोसले, स्मिता गोरे, प्रकाश रासकर, पल्लवी भोसले, महेश सपकाळ, विनोद सुतार, रमेश डोईफोडे, गजानन खंदारे, राहुल क्षीरसागर, रमेश जाधव, मनीषा नवले, जयंत धायगुडे, सविता सुतार, महादेव क्षीरसागर, रूपाली पिसाळ, रामदास जाधव, सारिका मोरे, राजेंद्र क्षीरसागर, गणेश शेलार यांचा गौरव केला. अजित क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. नीला कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सचिव डॉ. जितेंद्र पाठक यांनी आभार मानले.
फोटो २८वाई-रोटरी
वाई येथे रोटरी क्लबतर्फे गुणवंत तंत्रस्नेही शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या वेळी स्वाती हेरकळ, अजित क्षीरसागर, जितेंद्र पाठक, दीपक बागडे, प्रशांत पोळ उपस्थित होते.