बारामतीचा विकास अन् माण-खटाव भकास
By admin | Published: October 9, 2014 09:23 PM2014-10-09T21:23:16+5:302014-10-09T23:08:08+5:30
महादेव जानकर : शेखर गोरेंच्या वडूज येथील प्रचारसभेत पवारांवर घणाणात
वडूज : ‘जयकुमार गोरे यांनी शेती पाण्याच्या कितीही वल्गना केल्या तरी त्यांना या प्रश्नात म्हणावे तसे यश आले नाही. तर शरद पवारांनी बारामतीचा विकास करताना मात्र माण-खटावला भकास ठेवण्याचे काम केले आहे. दुष्काळी तालुक्याबाबत त्यांची नियत चांगली नाही,’ असा घणाणात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला.
वडूज येथे ‘रासप’चे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते
यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, दिलीप तुपे, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विलास माने, भाजप तालुकाध्यक्ष अनिल भोसले, नाना पुजारी, मोहन बुधे, बाळासाहेब खाडे, बबन वीरकर, महादेव मासाळ, विश्वास काळे, दीपक देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘आदिवासींच्या मतासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धनगर समाज आरक्षणास विरोध केला, असा आरोप करीत महादेव जानकर म्हणाले, ‘माणचे आमदार त्यांचेच काम करतात. त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी धडा शिकवावा.’
येळगावकर म्हणाले, ‘उरमोडीचे पाणी २००६ सालीच खटाव तालुक्यात आले आहे. आ. गोरे यांच्यात इतकी मर्दुमकी होती, तर त्यांनी ऐन दुष्काळात पाण्यासाठी जनता तडफडत असताना आतासारखे तकलादू पाणी का आणले नाही?’
सभेस राष्ट्रीय समाज पक्षाचे अण्णासाहेब कोळी, शिवाजी महानवर, युवराज बनगर, विजय साखरे, धीरज दवे, अप्पा पुकळे, प्रदीप शेटे, विजय काळे, संदीप गोडसे, अतुल पवार, चंद्रकांत गोडसे, सोनल गोरे, सुरेखा पखाले, अर्चना चव्हाण, राजेंद्र जगताप आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)