दत्ता अनपट यांच्यामुळे हिंगणगाव गटाचा विकास : संजीवराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:06+5:302021-09-26T04:42:06+5:30
आदर्की : फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करताना उद्योग-धंदे आणून बेरोजगारांना रोजगार दिला, त्याप्रमाणे धोम-बलकवडीचे पाणी आणून तालुका दुष्काळमुक्त करण्याचा ...
आदर्की : फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करताना उद्योग-धंदे आणून बेरोजगारांना रोजगार दिला, त्याप्रमाणे धोम-बलकवडीचे पाणी आणून तालुका दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे जिल्हा परिषद दत्ता अनपट यांच्या पाठपुराव्यामुळे हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकासात अग्रेसर आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
सासवड (झणझणे) व टाकोबाईचीवाडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्ता अनपट, माजी जिल्हा परिषद सदस्या सारिका अनपट, माजी सभापती प्रतिभा धुमाळ, दूध संघाचे माजी संचालक म्हस्कू अनपट, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक अनपट, चेअरमन संजय झणझणे, विशाल झणझणे, सरपंच राजेद्र काकडे, उपसरपंच धर्मवीर अनपट उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘फलटण तालुक्यात कोरोनाकाळात डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविकांनी केलेले काम कौतुकास्पद असून अजूनही कोरोनाचे संकट गेले नसून सर्वांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
दत्ता अनपट म्हणाले, ‘रामराजे, संजीवराजे, रघुनाथराजे, आ. दीपक चव्हाण यांनी विश्वास दाखवून हिंगणगाव जिल्हा परिषद गटात कोट्यवधींची विकासाची कामे प्रत्येक गावांत मूलभूत व भौतिक सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.’
या वेळी आ. दीपक चव्हाण, लतिका अनपट, प्रतिभा धुमाळ, विशाल झणझणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच दिलीप नलवडे, उपसरपंच गणेश कदम, शुभम नलवडे, दादासो बोबडे, कृणाल झणझणे, महेश अनपट, गणेश पवार, अमोल रासकर, नंदकुमार झणझणे, सतीश अनपट, ग्रामसेवक उद्धव सुपेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
२५आदर्की
फोटो - सासवड-टाकोबाईचीवाडी येथे विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना संजीवराजे निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.