‘टाऊन प्लॅनिंग’प्रमाणेच मलकापूरचा विकास
By admin | Published: July 9, 2015 10:45 PM2015-07-09T22:45:38+5:302015-07-09T22:45:38+5:30
एकमताने ठराव : कलम ३० चा नकाशाच कायम करण्याचा निर्णय; एकमताने शासनाकडे पाठपूरावा
सातारा : सत्ता गेल्यानंतर नैराश्येच्या खाईत लोटल्या गेलेल्या काँगे्रस व राष्ट्रवादीने आता पुन्हा कंबर कसली आहे. भाजप-शिवसेनेच्या शासनाने घेतलेल्या निर्णयांबाबत तसेच शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात दोन्ही पक्ष शुक्रवारी (दि. १0) रस्त्यावर उतरणार आहेत. दोन्ही पक्षांचा उद्देश एकच असला तरी आंदोलनाचे मार्ग वेगवेगळे आहेत. यानिमित्ताने साताऱ्यात दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. यात कोण बाजी मारतो, हेच पाहण्याजोगे ठरणार आहे.
युती शासनाच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादीने ज्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, नेमक्या त्याच दिवसाचा मुहूर्त काँगे्रसनेही साधला आहे. युती शासनाने दूध दरातील केलेली कपात, साखर निर्यातीवर घातलेली बंदी, सातारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा लांबवलेला विषय, गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आदी विषय या दोन्ही पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या अजेंड्यावर आहेत.
शासनाचा निषेध करण्याचा मुख्य उद्देश दोन्ही काँगे्रसचा आहे. पण जनतेच्या मनात असणारा असंतोष दोन्ही पक्षांनी एकत्रित येवून बाहेर काढला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता. पण स्वतंत्रपणे मोर्चे काढून हे आंदोलन होणार आहे. राष्ट्रवादीने तर पुणे-बंगळूर महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनाला जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची किनार आहे. आगामी काळातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही या दोन्ही काँगे्रस समोरसमोर असणार आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शनाद्वारे आपली ताकद दाखवून देण्याची संधी दोघांनीही साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
आता या शक्तिप्रदर्शनात कोण बाजी मारतो, हे पाहण्याजोगे ठरणार आहे. साहजिकच दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काँगे्रसने दोन माजी मुख्यमंत्र्यांकडे मोर्चाचे नेतृत्व दिले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कार्यकर्ते या मोर्चाला यावेत, याची तयारीही केली आहे. काँगे्रस कमिटीपासून साडेदहा वाजता हा मोर्चा निघणार आहे. तसेच राष्ट्रवादीने तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून २00 गाड्यांचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादी कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसांवरील ताण वाढणार...
दोन्ही काँगे्रसच्या मोर्चाची वेळ जवळपास सारखीच असल्याने पोवईनाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. साहजिकच पोलिसांवरील ताण वाढणार आहे. तसेच या परिसरातील वाहतूकही कोलमडणार आहे.