श्रमसंस्कारातून गावाचा विकास : पाटील
By admin | Published: February 13, 2015 12:07 AM2015-02-13T00:07:26+5:302015-02-13T00:50:56+5:30
पार्ले गावामध्ये गेली अनेक वर्षे सातत्याने विविध महाविद्यालयांची शिबिरे आयोजित करण्यात आली. ही बाब आदर्शवत
कऱ्हाड : ‘श्रमाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून होत असते. परंतु अशी शिबिरे आपल्या गावामध्ये घेण्यासाठी अनेक गावांचा नकारात्मक दृष्टिकोन असल्याचे दिसून येत आहे. पार्ले गावामध्ये गेली अनेक वर्षे सातत्याने विविध महाविद्यालयांची शिबिरे आयोजित करण्यात आली. ही बाब आदर्शवत असून, गावाच्या विकासासाठी उभारणी देणारी व कौतुकास्पद आहेत,’ असे गौरावेद्गार पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील काढले.
पार्ले, ता. कऱ्हाड येथे डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिर समारोपप्रसंगी ते बोलत होते. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, पार्लेचे माजी सरपंच राहुल पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, सरपंच राजेंद्र नलवडे-पाटील, प्राचार्य डॉ. अजय देशमुख, उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. अयुब कच्छी, जनसंपर्क अधिकारी अबुबकर सुतार व विद्यार्थी मंडळ सचिव रणजित निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य अजय देशमुख, ऋतुजा जाधव व महेश साळवी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अयुब कच्छी यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी अबुबकर सुतार यांनी आभार मानले. सुरेंद्र रजपूत, ऋतुजा जाधव व रोहित सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मिनल निजसुरे व शीतल जक्कनवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सोसायटीचे माजी अध्यक्ष संपतराव नलवडे, विजय खापे, राहुल शिवदास, प्रशांत पाटील, विजय पाटील, संतोष जाधव, अशोक माने, सुहास नलवडे, महादेव पाटील, अभिजित नलवडे, इंद्रजित नलवडे, सुधीर काशीद उपस्थित होते. (प्रतिनिधी)