एकजुटीने गावचा सर्वांगीण विकास करा : काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:40 AM2021-03-17T04:40:16+5:302021-03-17T04:40:16+5:30

औंध : ‘मागील दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करणे थोडे अवघड होते. मात्र, आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा परिपूर्ण ...

Development of the village in unity: Kale | एकजुटीने गावचा सर्वांगीण विकास करा : काळे

एकजुटीने गावचा सर्वांगीण विकास करा : काळे

Next

औंध : ‘मागील दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करणे थोडे अवघड होते. मात्र, आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा परिपूर्ण विकास शक्य आहे. त्यामुळे पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थ हातात हात घालून एकजुटीने गावचा सर्वांगीण विकास करावा,’ असे मत खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केले.

गोपूज येथे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन व अन्य कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच ॲड. संतोष कमाने, सदस्या उमा घार्गे, नीलम घार्गे, मनीषा जाधव, ग्रामसेवक सुनील राजगुरू, अनिल वसव, जयंत घार्गे, संभाजी घार्गे, सत्यवान कमाने, चंद्रकांत घार्गे, सुनील खराडे, बाळासाहेब चव्हाण, पृथ्वीराज घार्गे, दस्तगीर मुल्ला, सचिन घार्गे, बाबू मुल्ला, कृष्णत जाधव, माणिक घार्गे, सुरेश घार्गे, रामदास घार्गे, सोमनाथ घार्गे, गणपत मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी काळे म्हणाले, ‘नूतन पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला शोभेल असे काम करा. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन न्याय देण्याचे काम करीत रहा व आपले गाव आदर्श व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.’

उपसरपंच ॲड. संतोष कमाने यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेवक सुनील राजगुरू यांनी आभार मानले.

Web Title: Development of the village in unity: Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.