प्रभाग एकमधील विकासकामे मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:26 AM2021-07-20T04:26:05+5:302021-07-20T04:26:05+5:30

सातारा : गेल्या चार वर्षांच्या कालखंडात सातारा शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील बहुतांश विकासकामे पूर्ण झाली आहेत. सद्य परिस्थितीत ...

Development work in ward one will be arranged | प्रभाग एकमधील विकासकामे मार्गी लावणार

प्रभाग एकमधील विकासकामे मार्गी लावणार

Next

सातारा : गेल्या चार वर्षांच्या कालखंडात सातारा शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील बहुतांश विकासकामे पूर्ण झाली आहेत. सद्य परिस्थितीत याच प्रभागासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, अंतर्गत रस्ते, गटर्स, मल्टीपर्पज हॉल, जिम, संरक्षक भिंत, शौचालय, हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण ही कामे लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.

सातारा शहरातील मनाली कॉर्नर ते पोलीस मुख्यालयदरम्यान असणाऱ्या रस्त्याच्या कडेला नवीन गटर्सच्या कामाला १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राम हादगे, संतोष पाटील, दिलीप साबळे, बाबा पवार, किरण पवार, नितीन पवार, प्रशांत चव्हाण, अण्णा पाटणे, पंकज पवार, यतीराज कदम, श्रीधर हादगे आदी उपस्थित होते.

सीता हादगे पुढे म्हणाल्या, मनाली कॉर्नर ते जिल्हा मुख्यालय दरम्यानचा रस्ता अत्यंत उत्कृष्टपणे तयार करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याच्या कडेला गटर्सची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून ते साचून राहात असे. या रस्त्याच्या कडेला गटर्स बांधण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात होती. खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. त्यांनीही मागणीची दखल घेऊन प्रभाग क्रमांक एकमधील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यापैकी पहिल्या कामाचा शुभारंभ होत असून, नजीकच्या काळात उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत अन्य विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.

काहीजण पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय करत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्या धर्तीवर अनेकदा पाहणी दौरे केला असता त्यामध्ये सत्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे भविष्यात शहरातील काही सामाजिक संस्था, संघटना आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाणी वाचवा, जीवन वाचवा ही चळवळ हाती घेण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

फोटो : सातारा पालिका

साताऱ्यातील प्रभाग क्रमांक १मध्ये गटर्स कामाचा शुभारंभ सीता हादगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राम हादगे, अशोक साबळे, बाबा पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Development work in ward one will be arranged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.