मुख्य रस्ते ओस.. गल्लीत गलगलाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:04 AM2021-05-05T05:04:29+5:302021-05-05T05:04:29+5:30

सातारा : जिल्ह्यात कोराेनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने दि. ४ ते १० मेपर्यंत संचारबंदीचे नियम आणखी कठोर केले ...

Dew on the main roads .. Gossip in the streets! | मुख्य रस्ते ओस.. गल्लीत गलगलाट !

मुख्य रस्ते ओस.. गल्लीत गलगलाट !

Next

सातारा : जिल्ह्यात कोराेनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने दि. ४ ते १० मेपर्यंत संचारबंदीचे नियम आणखी कठोर केले आहेत. मंगळवारपासून या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आल्याने जिल्ह्यासह सातारा शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा दिवसभर बंद होत्या. रुग्णालय वगळता इतर कोणत्याही कामासाठी नागरिक घराबाहेर न पडल्याने मुख्य रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट, तर गल्लीबोळांत गलगलाट दिसून आला.

जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. गेल्या महिनाभरापासून बाधितांचा आकडा नवे-नवे उच्चांक गाठू लागला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. मात्र संचारबंदीच्या कालावधीतही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दि. ४ ते १० मे या कालावधीत संचारबंदीचे निर्र्बंध आणखी कठोर केले आहेत. या कालावधीत मेडिकल, रुग्णालय व कृषी क्षेत्रांशी संबंधित दुकाने वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र किराणा, भाजीपाला अशा वस्तू घरपोच उपलब्ध करण्यासही परवानगी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात मंगळवारपासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात आली. कारवाईच्या धास्तीने सातारा शहरातील एकही किराणा दुकान मंगळवारी उघडण्यात आले नाही. अनेकांनी किराणा साहित्य घरपोच उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले. ज्या भाजीपाला विक्रेत्यांनी पालिकेकडून परवाना मिळविला आहे अशांनी शहरात फिरून भाजीपाला विक्री केली. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाला. सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा शहरातील प्रत्येक चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले. दरम्यान, काही दुचाकीचालकांना पोलिसांकडून लाठीचा प्रसादही देण्यात आला. नेहमीच गर्दीने गजबजून जाणारे साताऱ्याचे प्रमुख रस्ते व चौकात दिवसभर शुकशुकाट पसरला होता.

(चौकट)

सातारकरांना भाजीपाला घरपोच

संचारबंदी लागू असूनही अनेक नागरिक भाजी खरेदीसाठी गर्दी करीत होते. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने भाजीपाला व फळे घरपोच देण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. पालिकेने अशा विक्रेत्यांना व्यवसायाचा परवाना दिला असून, हे विक्रेते नियमांचे पालन करून प्रत्येक प्रभागात भाजीपाला व फळांचा पुरवठा करणार आहेत. नागरिकांनी संचारबंदी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासाने केले आहे.

(कोट)

१. जिल्हाबंदीच्या नियमांची दुकानदारांकडून काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली.

२. सातारा शहरातील एकही किराणा दुकान मंगळवारी उघडण्यात आले नाही.

३. ज्या नागरिकांकडे दुकानदारांचे नंबर आहेत, अशा दुकानदारांनी नागरिकांना घरपोच सेवा दिली.

४. शहरातील भाजीपाला व फळ विक्री बंद होती. अनेकांनी शहरात फिरून भाजी विक्री केली.

५. पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात असल्याने अनेकांनी घराबाहेर न पडण्यातच धन्यता मानली.

६. रात्रीच्या वेळी तरुणांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. घरातून बाहेर पडून अनेकजण गल्ली-बोळांत क्रिकेटचे सामने खेळताना दिसून आले.

फोटो : जावेद खान

Web Title: Dew on the main roads .. Gossip in the streets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.