देऊर ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध

By admin | Published: October 18, 2015 10:48 PM2015-10-18T22:48:31+5:302015-10-18T23:34:04+5:30

कोरेगाव तालुका : शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी नेत्यांचा एकमुखी निर्धार

Dewar Gram Panchayat for the second time unconstitutional | देऊर ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध

देऊर ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध

Next

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याला राजकीय दिशा देणाऱ्या देऊरकरांनी गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर १९५२ नंतर दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देऊर गावचे पालकत्व घेतल्याने गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती गावाअंतर्गत असलेल्या सर्वच राजकीय गटांतील कार्यकर्त्यांना केली होती. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेला सर्वांनीच पाठिंबा देत शनिवारी शेवटच्या दिवशी ११ जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवड बिनविरोध झाली. १९५२ मध्ये देऊर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. १९९५ ते २००० या काळात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर कदम हे गावचे सरपंच तर चेतनसिंग कदम-पाटील हे उपसरपंचपदी कार्यरत होते. या काळात त्यांनी देऊर गावचा विकास गतिमान केला होता. यामुळे २००० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना गावाने पुन्हा बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर आता १५ वर्षांनंतर देऊरची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार दि. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता. एकूण ११ जागांसाठी वार्ड क्र. १ मधून संगीता अरुण थोरात, अजित चंद्रसेन कदम, नंदा तानाजी काकडे. वार्ड क्र. मधून प्रदीप महादेव कदम, नंदा गुलाबसिंग कदम, वसंत हणमंत जाधव. वार्ड क्र. ३ मधून बाळासाहेब तानाजी कदम, नीलिमा विजय कदम, शुभांगी उमेश देशमुख. तर वार्ड क्र. ४ मधून राजेंद्र बळीराम कदम, धनश्री अमोल कुंभार या ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
अर्ज भरल्यानंतर देऊर ग्रामस्थांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करीत गावातून गुलाल-फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. यावेळी धनसिंग कदम, किसनराव कदम, अ‍ॅड. संजीव कदम, गुलाबसिंग कदम, हंबीरराव कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (वार्ताहर)


गाव दत्तक...
देऊर गावच्या विकासासाठी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. या गावाच्या विकासासाठी प्रत्येकवर्षी निधी मिळणार आहे. यामुळे प्राधान्याने गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच गावास जोडणारे आसनगाव, बनवडी, बिचुकले, दहिगाव या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे गावाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत होत आहे.

Web Title: Dewar Gram Panchayat for the second time unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.