मलकापूरच्या कन्याशाळेत जंतनाशक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:57+5:302021-03-04T05:13:57+5:30
यावेळी मलकापूरच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. देसाई, मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, आरोग्यसेविका सुलोचना पावणे, अनुसया भोसले यांची ...
यावेळी मलकापूरच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. देसाई, मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, आरोग्यसेविका सुलोचना पावणे, अनुसया भोसले यांची उपस्थिती होती.
मैदानात खेळत असताना मुलांकडे नीट लक्ष न दिल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामध्ये कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. कृमी दोषाचे गांभीर्य लक्षात घेता, तो समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. या मोहिमेंतर्गत १ ते १९ वर्षे वयोगटातील लाभार्थींना अल्बेंडेझॉलची गोळी मोफत देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तबस्सुम कागदी यांनी यावेळी सांगितले.
मुख्याध्यापिका सुलोचना भिसे म्हणाल्या, आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे. तेव्हा सर्व विद्यार्थिनींनी या मोहिमेस सहकार्य करावे. या राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेमध्ये सहभागी होणे सर्व पालकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या मुला-मुलींना या मोहिमेमध्ये जंतनाशक औषध घेण्यास प्रवृत्त करावे, येणारी पिढी सशक्त आणि सुदृढ करावी.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
फोटो : ०३केआरडी०३
कॅप्शन : मलकापूर येथील कन्या शाळेत विद्यार्थिनींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. तबस्सुम कागदी, मुख्याध्यापिका सुलोचना भिसे यांच्यासह आरोग्य सेविका उपस्थित होत्या.