खड्डे मुजविण्याचे काम सुरू असतानाच डंपर ओढ्यात, वडूज-कातरखटाव रस्ता : नवीन पुलाची ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 05:35 PM2017-12-06T17:35:52+5:302017-12-06T17:38:43+5:30

कातरखटाव-वडूज या नऊ किलोमीटर अंतरातील खड्डे भरण्याचे काम गत दोन दिवसांपासून सुरू असतानाच मार्गावरील कुंभारमळवी पुलावरून सार्वजनिक बांधकाम खात्याचा खडीने भरलेला डंपर ओढ्यात कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संभाव्य धोका टळलेला नाही. हा पूल तातडीने दुरुस्त व्हावा, नवीन पुलाची मागणी जोर धरू लागली आहे.

Dhamper floods, Waduz-Katarkhatav road: demand of villagers for new bridge | खड्डे मुजविण्याचे काम सुरू असतानाच डंपर ओढ्यात, वडूज-कातरखटाव रस्ता : नवीन पुलाची ग्रामस्थांची मागणी

खड्डे मुजविण्याचे काम सुरू असतानाच डंपर ओढ्यात, वडूज-कातरखटाव रस्ता : नवीन पुलाची ग्रामस्थांची मागणी

Next
ठळक मुद्देजीवितहानी झाली नसली तरी संभाव्य धोका टळलेला नाही पूल तातडीने दुरुस्त व्हावा, नवीन पुलाची मागणी

वडूज : कातरखटाव-वडूज या नऊ किलोमीटर अंतरातील खड्डे भरण्याचे काम गत दोन दिवसांपासून सुरू असतानाच मार्गावरील कुंभारमळवी पुलावरून सार्वजनिक बांधकाम खात्याचा खडीने भरलेला डंपर ओढ्यात कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संभाव्य धोका टळलेला नाही. हा पूल तातडीने दुरुस्त व्हावा, नवीन पुलाची मागणी जोर धरू लागली आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाचा डंपर (एमएच ११ एएल १८४१) हा खड्डे मुजविण्यासाठी खडी घेऊन पुलावर आला होता. त्याठिकाणी खड्डे भरण्याचे काम सुरू होते. डंपर अवजड असल्याने पुलावरील मातीस गाडीचा बोजा सहन झाला नाही. त्यामुळे तेथील माती खचून गाडी अक्षरश: पाण्यात पडली. चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारून आपला जीव वाचवला. त्यात चालक किरकोळ जखमी झाला आहे.


विशेष म्हणजे काम चालू आहे, वाहने सावकाश चालवा असा फलक लावलेल्या ठिकाणी बांधकाम खात्याचीच गाडी पडल्याने व रस्ता खचल्याने ऊस वाहतुकीची अवजड वाहने काहीकाळ जाग्यावर थांबून राहिली होती.

गाडीतील आॅईल बंधाऱ्यातील पाण्यामध्ये पसरल्याने माशांची तडफड सुरू झाली होती. परिसरातील लोकांनी लगेचच गाडीकडे धाव घेतली व चालकाची विचारपूस केली. काहीवेळाने जेसीबीच्या साह्याने डंपर बाहेर काढण्यात यश आले.


या रस्त्यावर सध्या अवजड वाहनांची वर्दळ जादा प्रमाणात असते. सध्या तात्पुरता धोका टळलेला असलातरी येथून ये-जा करणारे वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. तरी तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी येथे मोठा पूल व्हावा, अशी अपेक्षा वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Dhamper floods, Waduz-Katarkhatav road: demand of villagers for new bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.