साताऱ्यातील ‘डीजी’महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बोगस नोटांविरुद्ध विशेष मोहीम

By प्रगती पाटील | Published: September 15, 2023 01:55 PM2023-09-15T13:55:41+5:302023-09-15T13:56:06+5:30

चलनात वाढतेय बोगस नोट

Dhananjaya Rao Gadgil College students special campaign against bogus notes | साताऱ्यातील ‘डीजी’महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बोगस नोटांविरुद्ध विशेष मोहीम

साताऱ्यातील ‘डीजी’महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बोगस नोटांविरुद्ध विशेष मोहीम

googlenewsNext

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या स्वायत्त महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने असली व नकली चलनी नोटा ओळखण्याबाबतचे तंत्र शिकवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेअंतर्गत बँकिंग चे विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नागरिकांना खऱ्या व खोट्या नोटा ओळखण्याबाबतचे तंत्र शिकवत आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वर्गात घेतलेले बँकिंग विषयक ज्ञान परिसरातील जनतेलाही उपयुक्त ठरावे व आपल्याकडील ज्ञानाचा लाभ समाजातील विविध घटकांना व्हावा या भूमिकेतून महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभाग गेली तीन वर्षे हे अभियान राबवत आहे. प्रतिवर्षी दीड ते दोन हजार नागरिकांना खºया व खोटा नोटा कशा ओळखाव्यात, खºया नोटांची पारख कशी करावी याबाबतची माहिती दिली जाते. प्रत्येक विद्यार्थी किमान दहा कुटुंबात जाऊन तेथील सदस्यांना याबाबतची माहिती देत असतात.

चलनात वाढतेय बोगस नोट

रिझर्व बँकेने दिलेल्या आकडेवारी नुसार सन २०२०-२१ मध्ये दोन लाख आठ हजार सहाशे, सन २०२१-२२ बावीस मध्ये दोन लाख तीस हजार नऊशे, तर २०२२-२३ मध्ये दोन लाख पंचवीस हजार सातशे इतक्या बोगस चलनी नोटा सापडल्या आहेत. रिझर्व बँकेच्या एका अहवालानुसार बँकिंग चॅनलमध्ये सापडलेल्या नोटांचे प्रमाण वाढत असून देशातील चलनामध्ये देखील अशा नोटांचे प्रमाण वाढत आहे.


सध्या डिटेक्ट झालेल्या नोटांचे प्रमाण दोन लाख २५ हजार पेक्षा अधिक असले तरी देशाच्या चलन व्यवस्थेत यापेक्षाही अधिक प्रमाणात बोगस नोटा असू शकतात अशा नोटा अनेक नागरिकांच्या हातातून हस्तांतरित होत असतात. अशा नोटा वेळीच ओळखून त्या चलनातून बाहेर करण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. म्हणून नोटा कशा ओळखाव्यात याची जागृती विद्यार्थी करत आहेत. - डॉ. विजय कुंभार, बँक मॅनेजमेंट विभाग प्रमुख

Web Title: Dhananjaya Rao Gadgil College students special campaign against bogus notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.