दहिवडीत धनगर कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सोडले; आरक्षणासाठी सरकारने मागितला वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 01:55 PM2023-09-24T13:55:26+5:302023-09-24T13:59:29+5:30

गेल्या काही दिवसापासून सकल धनगर समाज माण-खटाव यांच्या वतीने दहिवडीत येथे आमरण उपोषण सुरू होतं.

Dhangar community of Dahiwadi called off the fast The time requested by the government for reservation | दहिवडीत धनगर कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सोडले; आरक्षणासाठी सरकारने मागितला वेळ

दहिवडीत धनगर कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सोडले; आरक्षणासाठी सरकारने मागितला वेळ

googlenewsNext

सातारा- गेल्या काही दिवसापासून सकल धनगर समाज माण-खटाव यांच्या वतीने दहिवडीत येथे आमरण उपोषण सुरू होतं. अखेर काल हे उपोषण सोडण्यात आले आहे. काल मंत्री शंभुराज देसाई, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी धनगर आरक्षणासाठी त्यांनी वेळ मागितला, यावेळी उपोषणकर्त्यांनी सरबत घेत उपोषण मागे घेतले. 

"बापूंचे विचार आजही जगात अत्यंत समर्पक", 'मन की बात'मधून मोदींनी केला जी-२० व चंद्रयान-३ चा उल्लेख

या संदर्भात आमदार गोपीचद पडळकर यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. "
दहिवडी जि.सातारा येथे आमरण उपोषणाला बसलेले नितीन कटरे, वैभव गोरड, शरद गोरड व सुरेश गोरड यांच्याशी काल झालेल्या संवादाला मान देत व आपल्या प्रकृतीची काळजी घेत उपोषण सोडले. आता पुढील लढाई आपल्या सर्वांना न्यायालयात लढायची आहे.
यळकोट यळकोट, जय मल्हार, असं ट्विट आमदार पडळकर यांनी केलं आहे. 

माण तहसील कार्यालयासमोर वैभव गोरड, शरद गोरड, नितीन कटरे व सुरेश गोरड हे सकल धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्या घेऊन उपोषणास बसले आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या. धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण तत्काळ मंजूर करावे व त्याची अंमलबजावणी करावी. समाजातील मेंढपाळ बांधवांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे व हल्ले करणारांवरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. 

धनगर समाजासाठी १००० कोटी रुपयांचा निधी देण्याच्या केलेल्या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासंदर्भातचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारला तत्काळ पाठवावा. मेंढ्या चराईसाठी राखीव कुरणे ठेवावीत. तालुकास्तरावर लोकर खरेदी केंद्र उभारावीत. राजे यशवंतराव होळकर घरकुल योजना व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेचा लाभ लाभार्थ्यांना त्वरित वितरित करावा, अशा मागण्याही यात करण्यात आल्या होत्या. 

Web Title: Dhangar community of Dahiwadi called off the fast The time requested by the government for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.