सातारा जिल्ह्यातील धरणसाठा १८ टीएमसीने वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:38 PM2018-07-09T13:38:37+5:302018-07-09T13:44:53+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पावसाचा जोर असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गेल्या सव्वा महिन्याच्या काळात जिह्यातील प्रमुख सहा धरणांतील साठा सुमारे १८ टीएमसीने वाढला आहे. सद्य:स्थितीत कोयनेत दोन टीएमसीने साठा वाढून तो ४३.७० वर पोहोचला आहे. तर आवक २४ हजार २१४ इतकी आहे.

Dharamsana 18 TMC grew in Satara district | सातारा जिल्ह्यातील धरणसाठा १८ टीएमसीने वाढला

सातारा जिल्ह्यातील धरणसाठा १८ टीएमसीने वाढला

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील धरणसाठा १८ टीएमसीने वाढलापश्चिम भागात कायम हजेरी कोयनेत २४ हजार क्युसेक पाण्याची आवक

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पावसाचा जोर असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गेल्या सव्वा महिन्याच्या काळात जिह्यातील प्रमुख सहा धरणांतील साठा सुमारे १८ टीएमसीने वाढला आहे. सद्य:स्थितीत कोयनेत दोन टीएमसीने साठा वाढून तो ४३.७० वर पोहोचला आहे. तर आवक २४ हजार २१४ इतकी आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावली. सुरुवातीला काही दिवस पाऊस कोसळला. पश्चिम भागासह पूर्व दुष्काळी भागातही दमदार पाऊस बरसला. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली.

काही दिवसांच्या अवधीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. गेल्या एक महिन्याच्या काळात पावसाने तीनवेळा उघडीप दिली आणि पुन्हा हजेरी लावली. गेल्या सोमवारपासून पश्चिम भागात पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस कोसळत आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९२ तर आतापर्यंत १६७२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धोम धरणात १९१० क्युसेक पाण्याची आवक झाली असून, साठा ४.६४ टीएमसीवर पोहोचला आहे. कण्हेरमध्ये १५४० क्युसेकची आवक होऊन साठा ३.७६ तर उरमोडीत ११६९ क्युसेक पाण्याची आवक होऊन साठा ४.५५ टीएमसीवर गेला आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला आहे.

कोयनेत १४ टीएमसीने वाढ...

कोयना धरणक्षेत्रात जून महिन्यापासून पाऊस सुरू आहे. सद्य:स्थितीत साठा ४३.७० टीएमसी इतका आहे. १ जूनपासून धरणात जवळपास १४ टीएमसीने वाढ झाली आहे.


दि. ७ जुलैपर्यंत तारळी धरणात ०.०५ टीएमसीने वाढ झाली आहे. तर बलकवडीत ०.०६, कण्हेर ०.९, धोममध्ये ०.५ टीएमसीने वाढ झाली आहे.

धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये

धोम ०४  (२९८)
कोयना ९२  (१६७२)
बलकवडी ३० (७७६)
कण्हेर ०७ (२७४)
उरमोडी १० (३४४)
तारळी २८ (५४७)​​​​​​​



साताऱ्यात उघडझाप...

साताऱ्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस होत आहे. सद्य:स्थितीत पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे सातारकरांना सोमवारी सकाळच्या सुमारास काहीकाळ सूर्यदर्शन झाले. तरीही ढगाळ वातावरण कायम आहे.

..

Web Title: Dharamsana 18 TMC grew in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.