Satara: कर्मवीर जयंतीच्या पूर्वसंध्येला रयत सेवकांचा आक्रोश, प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन  

By प्रगती पाटील | Published: September 21, 2023 06:27 PM2023-09-21T18:27:29+5:302023-09-21T18:27:44+5:30

सातारा : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित कंटिन्यूएशन मेमो असलेल्या सेवकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालय सर्व विभागातील प्रलंबित असलेल्या वैयक्तिक मान्यता ...

Dharna agitation by unaided servants of Ryat Education Institute for pending demand in satara | Satara: कर्मवीर जयंतीच्या पूर्वसंध्येला रयत सेवकांचा आक्रोश, प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन  

Satara: कर्मवीर जयंतीच्या पूर्वसंध्येला रयत सेवकांचा आक्रोश, प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन  

googlenewsNext

सातारा : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित कंटिन्यूएशन मेमो असलेल्या सेवकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालय सर्व विभागातील प्रलंबित असलेल्या वैयक्तिक मान्यता होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी मान्यता होईपर्यंत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती रयत शिक्षण संस्था व संस्थेच्या शहरातील सर्व स्थानिक शासनाच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला धरणे आंदोलन सुरू केल्याने कार्यक्रमास गालबोट लागण्याची भीती आहे.

संस्थेला दिलेल्या निवेदनात तीव्र नाराजी व्यक्त करत नॉन पिटीशनर सेवकांच्या वैयक्तिक मान्यते संदर्भात त्रुटी पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव संचालक कार्यालयात तात्काळ पाठवावेत, उपसंचालकांनी कडे कळविलेल्या कृती पत्रातील अटी व शर्तींची पूर्तता करण्यासाठी संस्था स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही व्हावी, कंटिन्यूएशन मेमो असणाऱ्या सेवकांच्या वैयक्तिक मान्यता घेऊन संस्थेतील अनुदानित उपलब्ध जागेवर नेमणुका देऊन उर्वरित सेवकांना माध्यमिक विभागाकडे वर्ग करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. 

तसेच संस्थेतील सर्व सेवकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलला जागा देऊ नये अशी मागणी केली आहे. वरील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व सेवक संविधानिक पद्धतीने शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करणार आहेत यादरम्यान सेवकांच्या जीवनात धोका निर्माण झाल्यास किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास त्यात रयत शिक्षण संस्था सातारा व संस्थेचे पदाधिकारी जबाबदार असतील असेही सूचित करण्यात आले आहे. या निवेदनावर शरद इवरे, डॉ. सुजित हेगडे, विक्रांत पाटील, सूर्यकांत धनवडे, अंजूम मुलाणी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Dharna agitation by unaided servants of Ryat Education Institute for pending demand in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.