राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचे १६ जानेवारीला धरणे आंदोलन

By प्रमोद सुकरे | Published: December 13, 2022 12:04 PM2022-12-13T12:04:03+5:302022-12-13T12:04:35+5:30

राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना १०० टक्के वेतनासाठी सतत संघर्ष करावा लागतो

Dharne movement of municipal and municipal teachers in the state on January 16 | राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचे १६ जानेवारीला धरणे आंदोलन

राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचे १६ जानेवारीला धरणे आंदोलन

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : महाराष्ट्र शासन केवळ जिल्हा परिषद व खासगी शाळेतील शिक्षकांना आपले शिक्षक मानते. नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षकांवर सातत्याने अन्याय करीत आहेत. १०० टक्के वेतन व पदोन्नतीत योग्य न्याय न मिळाल्यास राज्यातील १० हजार शिक्षक नगरविकास विभागाच्या पर्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा राज्य नगरपालिका व महानगगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी केली.

सासवड येथे नुकतीच महामंडळ सभा झाली. त्याची माहिती देताना कोळी बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष संजय आवळे, कार्याध्यक्ष सुभाषराव कोल्हे, सरचिटणीस अरुण पवार, महिला आघाडी प्रमुख साधनाताई साळुंखे, ट्रस्ट सचिव शिवाजीराव राजिवडे, ट्रस्ट उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा, अमरावतीत विभागीय नेते संजय चुनारकर यांची उपस्थिती होती.

कोळी म्हणाले, ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षकां साठी शासन आदेश काढते.माञ नगरविकास विभागास नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचा त्यांना विसर पडला आहे.सर्व धोरणात्मक निर्णय जिल्हा परिषद शिक्षकांसाठी घेतले जातात. मात्र नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना वगळले जाते.१००% वेतना साठी संघर्ष करावा लागतो.

एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असल्या पासून सातत्याने मागणी करुनही एकाही प्रश्नांची दखल घेतली नाही.पदोन्नती,ऑनलाईन बदली पोर्टल, यासारखे गंभीर प्रश्नाकडे नगरविकास विभागाने कधीच लक्ष दिले नाही. राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना १०० टक्के वेतनासाठी सतत संघर्ष करावा लागतो. ही खेदाची बाब आहे.

नगरविकास विभागास जाग आणण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येत असून, आमचे प्रश्न न सोडविल्यास १६ जानेवारीला १० हजार शिक्षक आझाद मैदानावर धरणे आंदोलन करतील. यावरही शासनाने दखल न घेतल्यास नाविलाज म्हणून आत्मदहन करावे लागेल. असा इशारा कोळी यांनी नगरविकास विभागास दिला आहे.

Web Title: Dharne movement of municipal and municipal teachers in the state on January 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.