ढेबेवाडी-पाटण रस्ता बनतोय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:33 AM2021-01-09T04:33:09+5:302021-01-09T04:33:09+5:30
ढेबेवाडी ते पाटण या दिवशी घाटमार्गे मरळी, नवारस्ता आणि पाटणला जाणाºया रस्त्याच्या मजबुतीकरणासह रुंदीकरणासाठी सहा कोटी ९५ लाख रुपयांचा ...
ढेबेवाडी ते पाटण या दिवशी घाटमार्गे मरळी, नवारस्ता आणि पाटणला जाणाºया रस्त्याच्या मजबुतीकरणासह रुंदीकरणासाठी सहा कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. दोन वर्षापासून जास्त दिवस हे काम सुरू होते. रस्त्याच्या दुरुस्तीचे तसेच मजबुतीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यावर साधारण पहिल्या सहा महिन्यांत घाटातील कामाच्या दर्जाबाबत तक्रारी सुरू झाल्या होत्या. मात्र, बांधकाम विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे ठेकेदारानेही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत रेटून काम करण्याचा सपाटाच लावला होता. मध्यंतरीही काही ठिकाणी नव्याने रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, तरीही ठीकठिकाणी रस्त्याची अवस्था सध्या गंभीर बनली असून अपघाताची भीती वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.
ढेबेवाडी बसस्थानकामागून वाहणाऱ्या नाल्यावरील फरशी पुलाचे व रस्ता रुंदीकरणाचे काम न करता मध्येच सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गतवर्षी आणि यावर्षीही पावसाचे पाणी नजीकच्या दुकानात आणि घरांमध्ये घुसले होते.