पांडे गावानजीक धोम डाव्या कालव्याला भगदाड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:07+5:302021-06-29T04:26:07+5:30
वेळे : धोम जलाशयाचा डावा कालवा खानापूर गावाच्या मध्यभागातून पांडे गावाकडे जात असून, या कालव्याला दोन बाय तीन फूट ...
वेळे : धोम जलाशयाचा डावा कालवा खानापूर गावाच्या मध्यभागातून पांडे गावाकडे जात असून, या कालव्याला दोन बाय तीन फूट रुंदीचे मोठे भगदाड पडले आहे. ज्या ठिकाणी भगदाड पडले आहे, त्याच्या खालून मोठा ओढा गेला आहे. सध्या पावसाचे पाणी त्या भगदाडातून जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये या कालव्याला पावसाचे तसेच धरणातून सोडलेले पाणी महिनाभर सुरू असते. जर या पडलेल्या खड्ड्याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर हा कालवा गावाच्या मध्यभागी ठिकाणी असल्यामुळे फुटण्याची शक्यता दाट आहे. त्यातून कालव्याच्या खालील ५०० एकर जमीन, विहीर मोटारी यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होईल. कालवाखालील घराघरांमध्ये तसेच गावठाणात पाणी जाण्याची शक्यता जास्त आहे. यापूर्वीही त्याच ठिकाणी बाजूला मोठे भगदाड पडले होते, ही बाब ग्रामस्थांनी वर्तमानपत्रातून तसेच फोनवरून पाटबंधारे विभागाच्या कानावर घातली होती. त्याच्यावर पाटबंधारे विभागाने मुरुम टाकून ते भगदाड मुजवून ग्रामस्थांची समजूत काढली. पाटबंधारे विभागाला वारंवार पाठपुरावा करून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येणारा पावसाळा लक्षात घेता लवकर दुरुस्ती करण्याची मागणी पांडे ग्रामस्थांच्याकडून होत आहे.
२८वेळे
पांडे गावानजीक धोम डाव्या कालव्याला भगदाड पडले आहे. (छाया : अभिनव पवार)