ध्यास फौंडेशनचे जीवनदानाचे कार्य कौतुकास्पद : चंद्रकांत जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:43 AM2021-07-14T04:43:42+5:302021-07-14T04:43:42+5:30
सातारा : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. ही गरज ओळखून सातारा येथील ध्यास फौंडेशनने बालाजी ब्लड ...
सातारा : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. ही गरज ओळखून सातारा येथील ध्यास फौंडेशनने बालाजी ब्लड बँकेच्या सहाय्याने घेतलेल्या रक्तदान शिबिरामुळे अनेकांना जीवदान मिळणार आहे. त्यादृष्टीने ध्यास फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी काढले.
फौंडेशनच्या वतीने मोळाचा ओढा येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. वेदांतिकाराजे भोसले यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. शिबिरात सहभाग घेतलेल्यांना चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. रक्तदान केल्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असेही ते म्हणाले.
या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कुणाल ओतारी, सचिन कांबळे, चेतन नलवडे, सुरेश रूपनवर, अमन शेख, शौफोद्दिन शेख, श्रीनिवास वडेर, संजय शिंदे, उज्ज्वला शिंदे व इतरांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला सैदापूरच्या सरपंच शीतल पवार, प्रवीण पवार, हुसेन मोमीन, शबाना शेख, कृष्णा ओतारी, नारायण वडेर, बिपद कौर रामगडिया, प्रविणा फडतरे, वैजयंती ओतारी आदी उपस्थित होते.