महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले...पानांपानांवर हिमकणांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:01 PM2018-12-29T12:01:50+5:302018-12-29T12:16:57+5:30
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता. सकाळी वेण्णा लेक परिसरात झाडांच्या पानांवर साचलेल्या हिमकणांचे फोटो काढण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती.
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता. सकाळी वेण्णा लेक परिसरात झाडांच्या पानांवर साचलेल्या हिमकणांचे फोटो काढण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती.
सर्वच ऋतूंमध्ये महाबळेश्वर देशभरातील पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन असते. महाराष्ट्राचा पारा उतरत असताना महाबळेश्वरचेही तापमान गारेगार असते. गेल्या पंधरा दिवसांत पारा चांगलाच उतरला आहे. काल महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका अचानक वाढला. झाडांच्या पानांवर गोठलेले दवबिंदू पाहून पर्यटकही खूश झाले.
सकाळी येथील वेण्णा लेक परिसरातील अनेक झाडांच्या पानांवर गोठलेले दवबिंदू साचल्याचे स्थानिकांसह पर्यटकांना दिसल्यामुळे पर्यटकांमध्ये चांगलाच उत्साह होता. अनेकांनी हा नजारा मोबाईल कॅमेऱ्यांत कैद केला. भल्या सकाळपासून हे फोटो परस्परांबरोबरच सोशल मीडियावरही शेअर करण्यात हे पर्यटक अग्रभागी होते.