रेशनकार्डवरील मोफत धान्य आपल्याला मिळाले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:13+5:302021-06-24T04:26:13+5:30
रेशनिंगबाबत तक्रार; प्रशासन करणार कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मोफत धान्य दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली ...
रेशनिंगबाबत तक्रार; प्रशासन करणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मोफत धान्य दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागात मोफत धान्य दिले जात नाही. मे महिन्यामध्ये अंगठे घेऊन जूनमध्ये धान्याचे वाटप केल्याचे अनेक ठिकाणी समोर आले आहे. दोन महिन्यात वाटप करण्याचे ठरले असताना अनेक ठिकाणी एकाच महिन्यात हे वाटप झाले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मे आणि जून महिन्यांसाठी गरजू लोकांना मोफत तांदूळ, गहू देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात मे महिन्यामध्ये काही लोकांना धान्य वाटप करण्यात आले, मात्र अनेक लोक अजूनही या धान्यापासून वंचित असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने सक्रिय तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमध्ये जे दुकानदार दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
१) पाईंटर्स
एकूण रेशनकार्डधारक - ४,१०,३८४
बीपीएल - २८,२२०
अंत्योदय - ३,८२,१६४
२) दररोज काम करून पोट भागविणाऱ्या ग्रामीण भागातील तिघांच्या प्रतिक्रिया.
कोट
सध्या हाताला काम नाही आणि रेशनवर मोफत धान्यही नाही, या स्थितीत कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, हा प्रश्न आहे. मे महिन्यातील धान्य मिळाले, या महिन्यातील धान्य अजून मिळाले नसल्याने टंचाई जाणवत आहे.
- सयाजी पवार
कोट...
मागील महिन्यात रेशन दुकानदाराने अंगठा घेतला व नंतर धान्य उपलब्ध होईल, असे सांगितले होते. मात्र, अद्यापही धान्य मिळालेले नाही. शासनाची योजना दोन महिन्यांसाठी होती, असे सांगितले जाते. सध्या उसनवारी करून कुटुंब चालवत आहे.
- मंगेश कुंभार
कोट..
रेशनवर जे धान्य मिळते ते काही लोक अन्य लोकांना विकत देतात. ओपन दिलेल्या धान्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे, असे असतानाही काहीजण त्याची विक्री करतात. अजूनही काही लोकांना मोफत धान्य मिळत नाही.
- अंकुश बेलोसे
३) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा कोट
मे महिन्यात मोफत धान्य देण्यात आले आहे. काही दुकानदारांच्या बाबतीत तक्रारी आहेत. अशा दुकानांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या असून, जे दुकानदार चुकीचे काम करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
- स्नेहा किसवे-देवकाते
४) धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा (बॉक्स)
कार्डधारकांनी धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावावा. काही दुकानदार आगाऊ अंगठा घेत असल्याच्या तक्रारी आहेत. पॉस मशीनवर अंगठा दिल्यानंतर संबंधित कार्डधारकांना धान्य दिल्याचे नोंदवले जाते. त्यामुळे धान्य मिळाल्यानंतरच पॉस मशीनवर अंगठा घ्यावा, असे आवाहन करत आहे.