Lok Sabha Election 2019 आघाडी धर्मावरून काँग्रेसमध्ये मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:32 PM2019-04-12T23:32:15+5:302019-04-12T23:32:34+5:30
सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात काँगे्रस पक्षाची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. या परिस्थितीत पक्षाचा स्वाभिमान ...
सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात काँगे्रस पक्षाची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. या परिस्थितीत पक्षाचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी माण तालुक्यातील काँगे्रसचे शिलेदार सरसावले आहेत. काँगे्रस कुणाच्याही दावणीला न बांधता आघाडीधर्म पाळण्याचा ठाम निर्णय या शिलेदारांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे. काँगे्रस आमदार जयकुमार गोरे यांच्या नेमकी उलटी भूमिका काँगे्रसचे तालुकाध्यक्ष एम. के. भोसले यांनी घेतलेली दिसत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात काँगे्रस-राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांची पुन्हा आघाडी झाली आहे. या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी समजुतीने जागा वाटपाचा निर्णयही घेतला. जागा वाटपात सातारा व माढा हे दोन लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँगे्रसला मिळाले आहेत. जिंकून येण्याची क्षमता आणि मतदार संघात ज्या पक्षाची ताकद मोठी आहे, त्याच पक्षाला जागा वाटपात सोयीस्करपणे जागा सोडली जात असते.
माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षा पक्षाने राष्ट्रीय काँगे्रसचे साताऱ्याचे माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीमुळे काँगे्रसचे नुकसान झाल्याचा आरोप करत काँगे्रसचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा प्रचार करण्याचे जाहीर केले आहे.
साताºयाचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्य त्यामुळे काँगे्रसचे नेतृत्त्व रिते झाले. काँगे्रसचे जिल्ह्यातील बाहुबली नेते भाजपच्या कळपात जाऊन बसले. इतकेच काय वाईचे माजी आमदार मदन भोसले हे भाजपमध्ये गेल्याने जबर मोठा धक्का राष्ट्रीय काँगे्रसला बसला.
या सर्व राजकीय उलथापालथीत काँगे्रस पक्षाची भलतीच पडझड झाली. एका बाजूला भाजप-शिवसेनेचा वारू रोखण्याचे आव्हान असताना काँगे्रसमधून विद्यमान आमदारच भाजप उमेदवाराचा प्रचार करायला निघाले. राष्ट्रवादीत जाऊ नका...असं म्हणत शेखर गोरे हेही भाजपच्या प्रचारात उतरले.
ही परिस्थिती एका बाजूला असताना काँगे्रसचा स्वाभिमान जागृत करण्याचे काम माण तालुक्यातील काँगे्रसचे पदाधिकारी करत आहेत. काँगे्रसचे माण तालुकाध्यक्ष एम. के. भोसले यांनी काँगे्रसची पडझड रोखण्याचे काम हाती घेतले आहे.
काँगे्रसची फरफट रोखण्यासाठी पुढाकार
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करून केंद्रात राहुल गांधी यांचे हात मजबूत करण्याचा विचार यामागे आहे. गोरे बंधूंचे मोठे आव्हान पुढे दिसत असतानाही काँगे्रस पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका ही काँगे्रसजणांना दिलासा देणारी ठरली आहे. त्यातच कुणा एका व्यक्तीच्या सांगण्यानुसार तालुक्यातील पदाधिकारी फरफटत जाणार नाहीत, हा संदेशही भोसले यांनी यानिमित्ताने दिला आहे.